Take a fresh look at your lifestyle.

वाव.. १० सेकंदात ३३० कोटींच्या मोबाईलची विक्री; पहा कोणत्या कंपनीने केली ही कामगिरी

दिल्ली :

Advertisement

बाजारात नवा फोन आळा की खरेदी करायला अनेकांना आवडते. काहीजण तर पहिल्याचा दिवशी असा पीस आपल्या हातात पाडण्यासाठी धडपडत असतात. अशाच मंडळींच्या कृपेमुळे चीनच्या कंपनीने फ़क़्त १० सेकंदात तब्बल ३३० कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची विक्री करण्याची किमया साधली आहे.

Advertisement

स्मार्टफोन कंपनी वनप्लसच्या ‘वनप्लस ९’ या सिरीजमधील स्मार्टफोनने हे नवीन रेकॉर्ड बनवले आहे. वनप्लसने २४ मार्च रोजी चीनमध्ये वनप्लस ९ सीरीज लाँच केल्यावर चीनी ग्राहकांनी उंदंड प्रतिसाद देऊन हा विक्रम करण्यासाठी हातभार लावला आहे. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, जवळपास ३३६ कोटी रुपये किमतीच्या फोनची विक्री झाली आहे.

Advertisement

कंपनीने या स्मार्टफोन्सला ‘कलर्स ११’ सोबत लाँच केलेले आहे. ‘वनप्लस ९’ ८ जीबी आणि १२ जीबी रॅम सोबत लाँच केले आहे. या स्मार्टफोनला २५६ जीबी पर्यंत स्टोरेज सोबत आणले आहे. ‘वनप्लस ९ प्रो’ स्मार्टफोन १२ जीबी रॅम पर्यंत २५६ जीबी पर्यंत स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. वनप्ललस ९ सीरीज शिवाय कंपनी ने चीन मध्ये आपली पहिली स्मार्टवॉच वनप्लस वॉच (क्लासिक एडिशन) लाँच केले आहे.

Advertisement

स्मार्ट फोनसाठी जगभरात मोठी बाजारपेठ आहे. कोट्यवधी नागरिक स्मार्टफोनचा वापर करतात. त्यामुळे यामध्ये सातत्याने नवीन संशोधन करुन अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असणारे स्मार्टफोन तयार करुन मोबाइल कंपन्या बाजारात आणतात. आज जगात सॅमसंग, ओप्पो, व्हीवो, वनप्लस या काही आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री केली जाते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply