Take a fresh look at your lifestyle.

बियाण्यांप्रमाणे मग जीएम औषधांवर बंदी का नाही; शेतकरी संघटनेने विचारला महत्वाचा प्रश्न

पुणे :

Advertisement

विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम (जेनेटिकली मॉडिफाइड) वांग्यांच्या (BT Brinjal) चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल तर मग अौषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्य‍ा वापरा‍वर बंदी का नाही असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे.

Advertisement

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सुरू असलेल्य‍ा बिटी वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. काही पर्यावरणवादी, विकासविरोधी संघटनाचा आग्रह व पाच राज्यांनी चाचण्य‍ा घेण्याबाबत दाखवलेल्या प्रतिकूलतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आधिपत्याखाली काम करणार्‍या भारतीय किसान संघाच्या पदाधिकार्यांनी अनेक राज्य सरकारांना निवेदने ‍पाठवून बिटी वांग्याच्या चाचण्यांना नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये असा आग्रह धरला होता.               

Advertisement

बिटी वांगे खाण्यास निर्धोक आहेत. प्राणी, पर्यावरण व जमिनीवर याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत असा निर्वाळा संशोधकांनी दिला आहे. आयसीएआर या संस्थेनेसुद्धा जीएम पिकामुळे कोणताही धोका नाही असे स्पष्ट केलेले असत‍ाना पर्यावरण मंत्र्यांनी असा निर्णय घेणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. 

Advertisement

शेतीसाठी जनुक तंत्रज्ञान (जीएम) वापरण्यास विरोध करणारे अॉषधी क्षेत्रात होणार्‍या वापराबद्दल काही तक्रार करत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोकण्यासाठी तयार करण्यात आलेली लस किंवा सर्वच लसी याच जीएम तंत्राचा वापर करून तयार होतात. मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तींना दिले जाणारे इन्सुलीन, कॅन्सरसाठीची आैषधे, लहान मुलांमधील स्थूलपणा रोखण्यासाठीची अौषधे ही जीएम तंत्राचा वापर करुनच तयार होतात. या क्षेत्रात जर हे तंत्रज्ञान स्विकारले जात असेल तर शेती क्षेत्रात का नाही?

Advertisement

शासनाने कितीही बंदी घातली तरी शेती क्षेत्रात जीएम तंत्राज्ञानाचा प्रसार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सध्याही बंदी असली तरी लाखो हेक्टरमध्ये तणनाशकरोधक कपाशीची लागवड होत आहे व हजारो हेक्टर क्षेत्रावर बिटी वांग्याचीसुद्धा लागवड झालेली आहे. सरकारच्या परवानगीची शेतकर्‍यांना गरज नाही. शासनाने चाचण्या करण्यापेक्षा शेतकरीच चाचण्या घेत आहेत. थोड्याच कालावधीत कापशी व वांग्याबरोबरच मका, सोयाबीन, पपई आदी पिकांच्या जीएम वाणांची लागवड भारतभर होणार आहे असा विश्वास घनवट यांनी व्यक्त केला.

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply