Take a fresh look at your lifestyle.

काळजी नको, एका मेसेजवर करा आधार- पॅनकार्ड लिंक..!

आज आधार-पॅनकार्ड लिंक (Aadhaar-PAN Linking) करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज मुदत संपल्यानंतर आधार पॅनकार्ड लिंक करण्यासाठी १०००  रुपये दंड भरावे लागणार आहेत. हा दंड भरूनही जर आपण लिंकिंग केले नाही तर पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. या भीतीमुळे अनेकांनी आजच्या दिवशी अनेकांनी हे महत्वाचे काम मार्गी लावण्याचे ठरवले होते. पण, आयकर विभागाच्या वेबसाईटवर (Income Tax Department ) एकाच वेळी मोठी गर्दी उसळली. अन एकाचवेळी लाखोंच्या संख्येने ट्रॅफिक आल्याने आयकर विभागाची पॅन-आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली आहे. त्यामुळे लेटलतीफ मंडळी पुरती हैराण झाली आहे. त्यांना काय करावे तेही सुचेना झाले आहे. ते वारंवार हा प्रयत्न करत आहेत. मात्र, लिंकिंग होत नाही. 

Advertisement

त्यामुळे गोंधळून जाऊ नका. धीराने घ्या.. हे काम अगदी सोपे आहे. एका SMS वर आपण आधार आणि पॅन लिंक करू शकता. SMS द्वारे लिंकिंग कसे करावे, याबाबत आपण माहिती घेऊयात. 

Advertisement

खालील क्रमांकावर  मेसेज पाठवा…

Advertisement

५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत म्हणजेच आधार आणि पॅनशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरुन एसएमएस पाठवून आधार आणि पॅन लिंक करता येईल.

Advertisement

मेसेज कसा करावा 

Advertisement

तुमचा १२ आकडे असणारा आधारकार्ड क्रमांक आणि १० आकडे असणारा पॅन कार्ड क्रमांक एसएमएसवरुन आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आवश्यक असणार आहे. आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी खालील फॉरमॅटमध्ये मेसेज टाइप करावा…

Advertisement

UIDPAN<SPACE><12 Digit Aadhaar Number><SPACE><10 Digit PAN>

Advertisement

म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर

Advertisement

UIDPAN 100023456789 XXYZ0123X असा मेसेज पाठवल्यास यामधील 100023456789 हा आकडा आधार कार्ड क्रमांक असेल तर XXYZ0123X हा आकडा पॅन क्रमांक असेल.

Advertisement

आधार आणि पॅन लिंक करताना दोन्ही ठिकाणी तुमचं नाव, जन्म तारीख आणि इतर माहिती बरोबर आहे की नाही हे तपासून पहावे.

Advertisement

आपण तातडीने आधार – पॅन लिंक करून घ्यावे. अन्यथा, आपल्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. किंवा आपले पॅनकार्ड रद्दही होऊ शकते. 

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply