Take a fresh look at your lifestyle.

आणि त्यामुळे पाकिस्तानची मुजोरी उतरली; ‘त्या’साठी भारताकडे मदत मागतायेत इम्रान खान..!

दिल्ली :

Advertisement

भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तान देशाची राजकीय मुजोरी काही कमी झालेली नाही. मात्र, जनतेला अनेक अत्यावश्यक गोष्टींसाठी होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर आता परस्पर व्यापाराच्या मुद्द्यावर तरी पाकिस्तानची मुजोरी बरीच कमी झाली आहे.

Advertisement

पाकिस्तान करोना विषाणू, बेरोजगारी, वाढती गरिबी आणि महागाईने त्रस्त आहे. पाकिस्तानमधील साखरेचे वाढते दर आणि संकटांचा सामना करत असलेल्या वस्त्रोद्योगाला वाचविण्यासाठी पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने बुधवारी भारताशी संबंध सुधारण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वर्षांपासून ठप्प झालेला व्यापार पुन्हा सुरू करण्यासाठी इम्रान सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ बैठकीत इम्रान खान सरकारने भारताशी व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पाकिस्तानने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपल्यानंतर भारताशी संबंध तोडले होते. पाकिस्तान सरकार साखर आणि कापूस आयात करणार आहे कारण त्या देशाला आता या दोन वस्तूंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर प्रश्नासह दोन्ही देशांमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संवादासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पाठवलेल्या अभिनंदनाच्या उत्तरात खान यांनी हे पत्र लिहिले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply