Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून आधार-पॅन लिंकिंगसाठीची आयकर विभागाची वेबसाईट झाली हँग..!

पुणे :

Advertisement

आज आधार-पॅनकार्ड लिंक (Aadhaar-PAN Linking) करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज मुदत संपल्यानंतर आधार पॅनकार्ड लिंक करण्यासाठी १०००  रुपये दंड भरावे लागणार आहेत. हा दंड भरूनही जर आपण लिंकिंग केले नाही तर पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. या भीतीमुळे अनेकांनी आजच्या दिवशी अनेकांनी हे महत्वाचे काम मार्गी लावण्याचे ठरवले होते. पण, आयकर विभागाच्या वेबसाईटवर (Income Tax Department ) एकाच वेळी मोठी गर्दी उसळली. अन एकाचवेळी लाखोंच्या संख्येने ट्रॅफिक आल्याने आयकर विभागाची पॅन-आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली आहे. त्यामुळे लेटलतीफ मंडळी पुरती हैराण झाली आहे. त्यांना काय करावे तेही सुचेना झाले आहे. ते वारंवार हा प्रयत्न करत आहेत. मात्र, लिंकिंग होत नाही. 

Advertisement

आयकर विभागाने याबाबत मोठी जनजागृती केली होती. मात्र, आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय अंगलट आली आहे.  आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून तशा बातम्याही सारख्या दिल्या जात होत्या. मात्र, तरीदेखील अनेकांनी लिंक केले नसल्याने त्यांच्या आजच्या एकाच दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर उड्या पडल्या आहेत. एकीकडे साईट क्रॅश झालेली असताना दुसरीकडे बँकांचे मेसेज ग्राहकांना टेन्शन देत आहेत. सोशल मीडियावर आयकरची लिंक बंद पडल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.

Advertisement

आयकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी जशी आज करू, उद्या करू म्हणत शेवटच्या दिवशी काम करणाऱ्यांची तारांबळ उडते तशी तारांबळ आज उडालेली दिसत आहे. यामुळे अनेकांना सर्व्हर हँग झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत सोशल मिडीयावर ट्रेंड चालविला जात असून लिंकिंगसाठी मुदत वाढ करण्याची मागणी होत आहे. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply