Take a fresh look at your lifestyle.

‘एमआयडीसी सर्व्हर’ भगदाड प्रकरणी भाजपने केली ‘ही’ टीका; पहा काय म्हटलेय त्यांनी

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या वेबसाईटवर हॅकर्सने कब्जा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॅकर्सने याद्वारे तब्बल 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

यावर भाजपने ट्विटर खात्यावर म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या राज्यात आपण किती असुरक्षित आहोत, याचा आणखी एक पुरावा. राज्याच्या MIDC सारख्या महत्त्वाच्या विभागाचा सर्व्हरच हॅक. या सर्व्हरवर अतिमहत्त्वाची बरीच माहिती असणार, मग ती इतकी असुरक्षित? हॅकिंगची तक्रारही नाही? अब्रू झाकण्याचा किती केविलवाणा प्रयत्न कराल?

Advertisement

सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाला आहे. यामुळे मुंबईतील मुख्य कार्यालयासह राज्यातील सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद आहे. अधिकृत मेल करत हॅकर्सने 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर ही मागणी पूर्ण केली नाही, तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील संपूर्ण महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकी देण्यात आलेली आहे.

Advertisement

एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरु असून सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे. गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता MIDC चा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आल्याने त्याच दिशेने चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply