Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांनी केले ‘हे’ महत्वाचे आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अवघ्या महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती आहे. त्यातच आता लॉकडाऊन लावण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘नियम पाळा, लॉकडाउन टाळा’ असे आवाहन केले आहे.

Advertisement

निर्बंध अजून कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्य सरकारकडून यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी ‘नियम पाळा, लॉकडाउन टाळा’ असे अवाहन करून राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते.

Advertisement

त्यांनी म्हटले की, बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्रात कुठेही नाही. फ़क़्त जिथे खूप मागणी असते अशा ठराविक रुग्णालयात अडचणी आहेत. सध्या फ़क़्त मुंबई शहरात आयसीयूचे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत. त्याचवेळी काळजी म्हणून बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला दिल्या आहेत.

Advertisement

NCP on Twitter: “राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत. काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत- ना. @rajeshtope11 https://t.co/o6YJ7ODWTR” / Twitter

Advertisement

लॉकडाउन लागू करण्याच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नसून त्यासंबंधीची चर्चा नेहमी सुरु असते. राज्यात निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधी पावले उचलली जातील. त्यासाठी लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी हाच दृष्टीकोन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

लोक बेफिक्रीने वागणार असतील तर निर्बंध अधिक कडक करण्याशिवाय पर्याय नाही. मास्क वापरून गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टनिसंग ठेवत व्यवहार करणाऱ्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत करोना होण्याची शकयता कमीच आहे. त्यामुळे काळजी घेऊन सर्वांनी मदत कारणाचे आवाहन टोपे यांनी केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply