Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद अर्थसंकल्प : अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना मिळते ‘इतके’ मानधन; वाचा महत्वाची माहिती

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दि. २६ मार्च २०२१ रोजी पुढील वार्षिक खर्चाचे अंतिम अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३८ कोटी ९२ लाख रुपये इतका निधी जमा होऊन त्याचा खर्च होण्याचा अंदाज आहे. प्राप्त अहवालानुसार हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

Advertisement

यात पदाधिकाऱ्यांचे मानधन आणि प्रशासकीय बाबींवरील खर्चाची एकूण रक्कम १ कोटी ६१ लाख एवढी आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि इतर पदाधिकारी यांचे मानधन व त्यांचा प्रवास भत्ता आणि इतर खर्च समाविष्ट आहे.

Advertisement

चला तर आपणही जाणून घेऊयात की, कोणत्या पदाधिकाऱ्याला किती मानधन आणि प्रवासभत्ता मिळतो ते :

Advertisement
खर्चाचा तपशील रक्कम
जिल्हा परिषद अध्यक्ष मानधन२०,००० (प्रतिमाह)
उपाध्यक्ष मानधन१५,००० (प्रतिमाह)
सभापती जिल्हा परिषद मानधन१२,००० (प्रतिमाह)
सभापती पंचायत समिती मानधन१०,००० (प्रतिमाह)
उपसभापती पंचायत समिती मानधन ८,०००  (प्रतिमाह)
जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा प्रवास भत्ता४०,००० (वार्षिक)
उपाध्यक्ष व सभापती यांचा प्रवास भत्ता१,५०,००० (वार्षिक)
सभापती पंचायत समिती यांचा प्रवास भत्ता३,५१,८०० (वार्षिक)
उपसभापती पंचायत समिती यांचा प्रवास भत्ता२,७३,६०० (वार्षिक)
जिल्हा परिषद सदस्यांना प्रवास भत्ता (जि. प. सभा )११,४५,००० (वार्षिक)
पंचायत समिती सदस्य प्रवास भत्ता (पं. स. सभा )१८,१७,६०० (वार्षिक)
जिल्हा परिषद सदस्यांना मतदार संघात फिरतीसाठी प्रवासभत्ता २५,००,००० (वार्षिक)  
सादील खर्च ( स्टेशनरी खर्च ) (अध्यक्ष व सभापती)३२,००,००० (वार्षिक)
सादील खर्च ( स्टेशनरी खर्च ) (पं. सभापती)१६,२०,००० (वार्षिक)
जिल्हा परिषद आम सभेसाठीची तरतूद१,३३,००० (वार्षिक)
जि. प. सदस्य व पं. समिती सदस्य यांच्यासाठी प्रशिक्षण१,६०,००० (वार्षिक)
ई प्रशासन लॅन, व्हिडिओ कॉन्फरंसिंगप्रणाली, आधारबेस बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली देखभाल व दुरस्ती खर्च   ७,५०,००० (वार्षिक)

अहमदनगर जिल्हा परिषदेचा असा एकूण अनिवार्य असणारा खर्च १ कोटी ६१ लाख १ हजार रुपये इतका आहे. 

Advertisement

संपादन : महादेव दळवी

Advertisement

Advertisement

Leave a Reply