Take a fresh look at your lifestyle.

भाजप खासदाराने दिला मोदींना घराचा आहेर; पहा पाकिस्तानच्या मुद्द्यावर काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली :

Advertisement

भारत-पाकिस्तान यांच्यातील वैरभाव दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे. काश्मीर मुद्द्यावरही केंद्र सरकारने कलम 370 हटवून आपली भूमिका स्पष्ट केल्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान वेळोवेळी भारताच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्याचवेळी भारत-पाकिस्तान व्यापाराला वृद्धी देण्याची बातमी आल्यावर भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी भडकले आहेत.

Advertisement

स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामींनी बुधवारी पाकिस्तानशी व्यापार पूर्ववत होण्याच्या शक्यतेविषयी एक बातमी ट्विट केले आहे. स्वामींनी म्हटले आहे की, ‘काश्मीर मुद्द्यावर शरण गेलोय.. गुड बाय पोके.. मला खात्री आहे की लवकरच लंडनमध्ये मोदी इम्रानबरोबर डिनर करतील.’

Advertisement

मागील काही दिवसांपासून मोदी सरकारवर स्वामींनी वेळोवेळी हल्ला केला आहे. पाकिस्तानशी भारताबरोबरच्या व्यापाराविषयी मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक आज होत आहे. मागील दोन वर्षांपासून बंद असलेला पाकिस्तानबरोबरचा व्यापार व्यापार संबंध पुन्हा सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय व्यापार एकतर्फीपणे स्थगित केला होता.

Advertisement

मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाला एक पत्र लिहून म्हटले होते की, पाकिस्तानबरोबर संबंधांची भारताची इच्छा आहे. यासाठी परस्पर विश्वास आणि सहकार्य करणे आवश्यक आहे. कोरोना कालावधी मानवतेसाठी अत्यंत कठीण आहे. आपण आणि पाकिस्तानच्या जनतेने हे आव्हान निर्भयतेने पार पाडावे अशी माझी इच्छा आहे.

Advertisement

यानंतर नरेंद्र मोदींच्या पत्रालाही इम्रान खान यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी अभिवादन संदेशाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि जम्मू-काश्मीरचा मुद्दाही उपस्थित केला. इम्रानने लिहिले की दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरता ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जम्मू-काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांच्या निराकरणांवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या लोकांना भारतासह सर्व शेजार्‍यांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत.

Advertisement

एकूणच पाकिस्तानच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची भूमिका आक्रमक आहे. अशावेळी या देशाशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर स्वामींनी आपली निषेधाची भूमिका स्पष्ट केली आहे. आता इतर नेते आणि पक्ष यावर कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply