Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : वाझेप्रकरणी आली नवीन माहिती पुढे; एनआयएने केला महत्त्वपूर्ण दावा..!

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कराचे मालकव्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाला दररोज नवनवे कंगोरे पुढे येत आहेत. आताही राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने नवीन दावा केला आहे.

Advertisement

एनआयएने म्हटले आहे की, निलंबित अधिकारी सचिन वाझे हाही हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला तिथे उपस्थित होता. हिरेन यांच्या हत्येचा कट रचलेल्या बैठकीला वाझेसह विनायक शिंदे हाही उपस्थित होता. हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीशी संपर्क करण्यासाठी वाझेने मोबाईलद्वारे संपर्क केला होता. एनआयएने कट रचणाऱ्या आरोपीच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. मात्र, ही तपास संस्था कट आणि त्याच्या उद्देशाच्या खूप जवळ पोहचली असल्याचे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे.

Advertisement

एकूणच हिरेन यांच्या मृत्यूचे आणि त्यासह अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचे नेमके मास्टरमाइंड आणि त्याचा उद्देश यांची उकल होण्याची शक्यता वाढलेली आहे. मात्र, वाझे यांच्यासह यात नेमक्या कोणा मोठ्या व्यक्ती, अधिकारी, राजकारणी किंवा व्यावसायिक यांचा संबंध आहे याची उत्सुकता वाढलेली आहे. अवघ्या महाराष्ट्रासह देशाचेही लक्ष या प्रकरणाकडे लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply