Take a fresh look at your lifestyle.

ज्यूट ज्वारी सजणार पंजाबी थाळीत; पहा नेमका काय फायदा होणार शेतकऱ्यांना

उस्मानाबाद / सोलापूर :

Advertisement

उस्मानाबाद व सोलापूर पट्ट्यातील ज्वारी म्हणजे अनेकांची आवड. याच भागातील भूम व परंडा तालुक्यातील ज्यूट ज्वारी प्रसिद्ध आहे. या ज्वारीला पंजाब राज्यातून मोठी मागणी आलेली आहे. त्यासाठी काही शेतकरी उत्पादक कंपन्या करार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भूम आणि परंडा तालुक्यातील ज्यूट ज्वारीची गुणवत्ता अतिशय उत्तम असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या भागातील मातीच्या पोतामुळे आणि यामधील पिकासाठीच्या पोषक घटकांमुळे ही ज्वारी आता देशा-परदेशात भाव खात आहे.

Advertisement

येथील मातीचे काही नमुने नाशिक येथील चित्तेगाव फाटा येथील राष्ट्रीय संशोधन संस्थेकडे तपासण्यात आलेले होते. या मातीमुळे ज्वारी या अन्नधान्याची गुणवत्ता उत्तम तर आहेच मात्र, या ज्वारीच्या कडब्याची उंची १० ते १२ फुट होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

सीताराम वणवे (संस्थापक अध्यक्ष आनंदवाडी अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी आनंदवाडी, ता. भूम) यांनी दिव्य मराठीला याबाबत सांगितले आहे की, पंजाब येथील कंपनीशी आमचे बोलणे झाले आहे. करार होण्याकडे वाटचाल चालू आहे. आपल्या भागातील ज्वारी शेतकऱ्यांनी विकली आहे. यावर्षी काही आणि पुढील वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे आपला शेतकरी सबल होऊन आत्महत्येपासून दूर जाणार आहे. आमचे ते ध्येय आहे.

Advertisement

या मातीमधील पोषक घटक (माती परीक्षण अहवाल) असे :

Advertisement
 • नायट्रोजन (१. ६१)
 • प्रोटीन (१०.०६)
 • फाॅस्फरस (०. २३५८)
 • पोटॅश (०. ४४१०)
 • कॅल्शियम (०. ०७१५)
 • मॅग्नेशियम(०. १७)
 • सोडियम (०. ०४२)
 • सल्फर(०. ०३)
 • कॉपर(२३. १५)
 • आयरन (७०. ४०)
 • मॅगनीज (१०. ८५)
 • झिंक (२५. ७२)

या ज्वारीस प्रति क्विंटल ४ हजार ते ५ पाच हजार ५०० रुपयांपर्यत दर मिळणार आहे . त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यास येणाऱ्या काळात आर्थिक सबल होण्यास मोठी संधी मिळणार आहे. एकंदरीतच जूट या ज्वारीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्नती येणाऱ्या काळात होणार हे दिसून येत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply