Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. 30 हजार ‘एमएएच’ची पॉवरबँक आली की; पहा फ़क़्त 2 हजारात मिळणार ‘हे’ फिचर

मुंबई :

Advertisement

सध्या प्रवास कमी झालेला आहे. कारण करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यामुळे लागू होत असलेला लॉकडाऊन यामुळे प्रवास टाळला जात आहे. मात्र, ही परिस्थिती संपल्यावर किंवा ग्रामीण भागात विजेचा तुटवडा जिथे आहे तिथे मोबाईल पॉवरबँक हा एक उत्तम पर्याय आहे. अशा सर्वांसाठी शाओमी कंपनीची 30 हजार ‘एमएएच’ची पॉवरबँक आली आहे.

Advertisement

एमआयने भारतात सर्वात मोठी पॉवरबँक आणली आहे. एमआय बूस्ट प्रो (Mi Boost Pro) पॉवरबँकमध्ये 30,000 एमएएच (30,000mAh) बॅटरी असून वेगवान चार्जिंग व्यतिरिक्त पॉवर डिलिव्हरी (पीडी) 3.0 देखील देण्यात आली आहे. त्याशिवाय शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करण्यासाठी 16 लेअर सर्किट संरक्षण देण्यात आले आहे.

Advertisement

शाओमीने म्हटले आहे की, पीडी 3.0 च्या मदतीने ही पॉवरबँक 24 वॅट चार्जिंगच्या पोर्टद्वारे 7.5 तासात पूर्णपणे चार्ज होईल. या पॉवर बँकेमध्ये लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. MI बूस्ट प्रो पॉवरबँक सध्या क्राउडफंडिंगद्वारे विकली जात आहे. सध्या ही पॉवरबँक फ़क़्त 1,999 रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. परंतु, नंतर याची किंमत 3,499 रुपये होणार आहे.

Advertisement

mi बूस्ट प्रो वैशिष्ट्ये अशी :

Advertisement
  1. ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये ही मिळेल
  2. पॉवरबँकला दोन यूएसबी, एक प्रकार-ए आणि यूएसबी टाइप-सी यासह तीन पोर्ट आहेत
  3. टाईप-सी पोर्टचा वापर इतर डिव्हाइस चार्ज करण्याव्यतिरिक्त पॉवरबँक चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो
  4. टाइप-सी व्यतिरिक्त, मायक्रो यूएसबीद्वारे पॉवरबँक चार्जिंग केली जाऊ शकते
  5. पॉवरबँक 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह येते आणि एकाच वेळी तीन डिव्‍हाइसेसला चार्ज करू शकते.
  6. या पॉवरबँकमध्ये लहान गॅझेट्स चार्ज करण्यासाठी स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट वैशिष्ट्य आहे
  7. दोन वेळा पॉवर बटण दाबून पॉवर बँक दोन तास कालावधीसाठी लो पॉवर मोडमध्ये जाईल त्यानंतर आपण वायरलेस इयरफोन आदि गोष्टी चार्ज करू शकता

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply