Take a fresh look at your lifestyle.

म्हणून उद्योजक महिंद्रांनी हरल्यानंतरही केले इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक..!


मुंबई :

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने सामना जिंकत मालिका विजयाचा किताब पटकावला असला तरी इंग्लंड संघाचा खेळाडू सॅम करनने आपल्या खेळाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. पराभवानंतर सॅमने असे ट्विट केले की, या मालिकेतून खूप काही शिकता आले, चांगली मालिका झाली. भारताचे अभिनंदन.

Advertisement

त्याच्या या ट्विटवर सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी असे लिहिले की, जर तुम्ही पराक्रम, नम्रता आणि कृपेची व्याख्या शोधत असाल तर …. महिंद्रा कंपनी खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी नेहमीच पुढे येत असते. त्यांनी सॅमच्या खेळीचे कौतुक केले.

Advertisement

(2) anand mahindra on Twitter: “If you’re looking for the definition of heroism, humility & grace…” / Twitter

Advertisement

इंग्लंडचा युवा आणि प्रतिभावान अष्टपैलू सॅम करनने रविवारी इंग्लडचा डाव सावरला. त्याने एकट्याने इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. मात्र, भारताच्या शानदार गोलंदाजीमुळे ते सामना जिंकू शकला नाही. त्याने आपल्या खेळीत डावात ८३ चेंडूत ९५ धावा करुन तो नाबाद राहिला. त्याने एकूण ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. यासह गोलंदाजीमध्येही त्याने ५ षटकांत ४३ धावा देऊन १ बळी मिळवला.

Advertisement

दरम्यान, सॅम करनचा शानदार खेळ पाहून आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जच्या शिबिरातही आनंदाची लाट उसळली आहे. कारण तो सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील हंगामात तो चेन्नईसाठी सलामीला आला होता. यावेळी करनने चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत २३ सामन्यात २८१ धावा केल्या आहेत.  

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply