Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. देशात महाराष्ट्राच्या तब्बल ८ जिल्ह्यांत गंभीर स्थिती; पहा कुठे झालाय उद्रेक

मुंबई :

Advertisement

देशात करोनाचा फैलाव झपाट्याने होत असून अनेक शहरांत परिस्थिती गंभीर होत आहे. महाराष्ट्रात तर करोनाने थैमान घातले असून राज्यातील आठ जिल्ह्यात करोना संसर्ग सर्वाधिक आहे. देशातील दहा जिल्ह्यात करोना संसर्ग सर्वाधिक आहे. यातील आठ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

Advertisement

यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड आणि नगर जिल्ह्याचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दिल्ली आणि बंगळुरू शहर येथेही संसर्ग आधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.

Advertisement

आठवड्याचा राष्ट्रीय सरासरीचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६५ टक्के आहे. यात महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्के, पंजाबची ८.८२ टक्के, छत्तीसगड ८ टक्के, मध्य प्रदेशचा ७.८२ टक्के, तामिळनाडू २.५० टक्के, कर्नाटकचा २.४५ टक्के, गुजरातचा २.२ टक्के आणि दिल्लीचा २.०४ टक्के इतका आहे, असे त्यांनी सांगितले. देशात करोना रुग्ण वाढत असले तरी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Advertisement

निर्बंध आधिक कठोर केले जात आहेत. लॉकडाउन करण्याचाही विचार आहे मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, नगर जिल्ह्यातही करोनाचा वेग वाढत आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येत आहेत.  

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply