Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींवर आक्षेपार्ह टीका; पहा काय म्हटलेय ‘त्या’ नेत्याने नेमके

दिल्ली :

Advertisement

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे वक्तृत्व सतत वादाचा विषय बनत चालले आहे. केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर आक्षेपार्ह टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी केवळ मुलींच्या महाविद्यालयात जातात कारण ते अविवाहित आहेत. कॉंग्रेसने जॉयस यांच्या या टीकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे.

Advertisement

2014 मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुक जिंकणार्‍या माजी खासदार जॉर्ज यांनी सोमवारी (दि. 29 मार्च) केरळ विधानसभा निवडणूक सभेत भाषण केले. त्यादरम्यान, त्यांनी कोची येथील महिला महाविद्यालयातील महिला विद्यार्थ्यांचा संदर्भ घेत असे म्हटले. मात्र, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन याबाबत म्हणाले की, डाव्या लोकशाही आघाडीचा (एलडीएफ) राहुल गांधींवर केलेल्या वैयक्तिक टीकेमध्ये काहीही वाटा नाही. उलट आम्ही राहुल गांधींचा राजकीय विरोध करीत असलो तरीही असे वैयक्तिकरित्या काहीही टीका करणे चूक आहे.

Advertisement

जॉर्ज यांनी कॉंग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) आणि विशेषत: राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला होता. ते म्हणाले की, राहुल गांधींची निवडणूक प्रचार म्हणजे ते फक्त मुलींच्या महाविद्यालयात जातील. राहुल गांधी विवाहित नाहीत, म्हणून अशा ठिकाणीच जातात.

Advertisement

जॉर्ज यांच्या या वक्तव्यावर केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला यांनी मंगळवारी (30 मार्च) तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. माजी खासदारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. 

Advertisement

खासदार आणि कॉंग्रेसचे नेते डी. कुरियाकोसे यांनी माजी खासदार जॉर्जचा निषेध करताना म्हटले आहे की, बहुधा ते स्वतःच्या चारित्र्याबद्दल बोलले असतील. राहुल गांधींवर टीका करण्याची त्यांची क्षमता आहे का? ते माजी ऊर्जामंत्री एम.एम. मणि यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. तेही अशीच अपमानास्पद टीका करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांनी राहुल गांधींचा केवळ अपमानच केला नाही, तर हा विद्यार्थ्यांचाही अपमान आहे. निवेदनावर कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारीची तयारी केली आहे.

Advertisement

संपादन : राम बोराटे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply