शेअर बाजारात पैसे कमावण्याच्या ‘या’ आहेत बफेज ट्रिक्स; वाचा आणि अभ्यास करून पैसे कमवा
मुंबई :
शेअर बाजार हा जुगार नसून पैसे कमावण्याची एक बेस्ट संधी आहे. हेच अवघ्या जगाला अधोरेखित करून दाखवले आहे ते गुंतवणूकगुरू वॉरन बफे यांनी. शेअर मार्केटमधून किती पैसे कमवू शकतो, असे कुत्सितपणे म्हणणाऱ्यांना एकच प्रत्युत्तर द्या की, बफेंनी जितके कमावले तितके म्हणजे जगातील नंबर एकचे श्रीमंत होण्याची संधी हा बाजार आपल्याला देऊ शकेल.
नवीन गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास घाबरवले जाते. सामान्य माणसाला हा जुगार आणि पैसे गमावण्याचा राजमार्ग वाटतो. मात्र, हे वास्तव नाही. मात्र, अंधपणे आणि मी लैच मार्केटसम्राट आहे असे वाटत असल्यास किंवा वाटायला लागले की, हे मार्केट कोणाचाही बाजार एकाच दिवसात उठवू शकतो. त्यामुळे बफे यांच्या काही ट्रिक्स आणि तुमचा व्यक्तिगत अभ्यास यानुसार गुंतवणूक करून मार्केटमधु पैसे मिळवायला हरकत नाही.
पण जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफे यांचे मत मार्केटबद्दल वेगळं आहे. गुंतवणूकदारांनी बाजाराची घसरण झाल्यास मनात भीती घेऊ नये. उलट बफे म्हणतात की, मार्केट जसे वर जाते, तसेच खाली येते. त्यामुळे दोन्हीवेळी अभ्यास आणि योग्य आडाखे बांधून पैसे कमावण्याची संधी आपण साधू शकतो.
बफे म्हणतात की, जेव्हा बाजार घसरत असेल तेव्हा गुंतवणूकदाराने शांत राहिले पाहिजे. घाईत शेअर्सची विक्री करण्यासाठीचे कोणतेही पाऊल तोट्यात नेऊ शकते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीची मूलतत्वे पाळली पाहिजेत. शेअर्स विकत घ्यावेत आणि बराच काळ ठेवण्याची तयारी ठेवावी. पडझड ही काय आताप आणि पुढेही होऊ शकते. जशी पडझड सांगून होत नाही, तशीच वाढसुद्धा कोणालाही निमंत्रण देऊन येत नाही. म्हणूनच बाजारावर बारीक नजर ठेवा. घाबरू नका आणि स्वत: ला शांत ठेवून अभ्यासपूर्ण निर्णय घ्या.
संपूर्ण आयुष्यासाठी अशी गुंतवणूक करा जे आपल्याला नेहमीच नफा देईल. बाजारातील न्यूज आणि अफवा यांना अजिबात बळी पडू नका. रिक्स जास्त होणार नाही याचीही काळजी घ्या. दुसर्या गुंतवणूकदाराकडे पाहून पैशाची गुंतवणूक करु नये.
बफे यांच्या मते, जर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल तरच गुंतवणूक करा. अफवांकडे दुर्लक्ष करा. शेअर बाजारात अफवा मोठ्या प्रमाणात पळवल्या जातात. चांगल्या कंपनीचा शेअर जर उचित किंमतीत असेल तर त्यापेक्षा जास्त किंमतीला रास्त कंपनीचा साठा खरेदी करण्याचे टाळा. चुकीच्या आणि भपका करणाऱ्या शेअरची खरेदी जास्त भावाने अजिबात करू नका.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत: वर विश्वास ठेवा की आपण यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकतो. आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेहमीच वैविध्य आणा. वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा. ज्यामुळे जोखीम कमी होईल. जर आपण चुकीचे शेअर घेतले आहेत असे वाटले तर लगोलग शांत डोक्याने त्यावर निर्णय घ्या, असेही बफे सुचवतात.
‘इंट्रा डे’चा इन्व्हेस्टर होण्याऐवजी दीर्घकालीन उद्देश घेऊन बाजारात या. उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. केवळ संयम ठेवून पैसे वाढतात, असेही नाही. पण हा गुण खूप आवश्यक आहे. जास्त परताव्याचे आमिष असल्यास बळी पडू नका. जर तुम्हाला 15 ते 20 टक्के परतावा दिसत असेल तर गुंतवणूक करा. जर आपण बाजारात गुंतवणूक केली असेल तर सुसंवाद आणि संयम आवश्यक आहे. असे न केल्याने बरेच गुंतवणूकदार त्यांचे स्वतःचे शत्रू बनतात.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!