Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमध्ये लागू झाला ‘हा’ही नियम; बाजारात जायला घ्यावे लागणार तिकीट, आणि प्रसंगी भरावा लागणार दंड..!

नाशिक :

Advertisement

नाशिकच्या नागरिकांना आता प्रत्येकवेळी बाजारात जाताना पाच रुपये देऊन तिकीट घ्यावे लागणार आहे.हे तिकीट पुढच्या एका तासासाठी वैध असेल. जर एखादी व्यक्ती एका तासाच्या आत बाजारातून परत आली नाही तर त्याला 500 रुपये दंड भरावा लागेल. नाशिक महानगरपालिकेकडून हे पाच रुपये गोळा केले जातील आणि स्वच्छता प्रक्रियेसारख्या कोरोनाशी संबंधित आरोग्य सेवेसाठी हा निधी वापरला जाईल. शहर पोलिसही या कामात मनपाला मदत करणार आहेत.

Advertisement

नाशिकच्या मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये सोमवारी (दि.२९) प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुपारनंतर मेनरोड, शिवाजीरोड येथील मुख्य बाजारपेठेकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले आहेत. त्यातून जातानाच नागरिकांना तिकीट दिले जात आहे. प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन‌् प्रवेश शुल्क वसुलीची मात्रा शोधून काढली आहे.

Advertisement

हा प्रकार खूपच प्रभावी ठरत असून इतर शहरांनीही असाच नियम लागू करून अर्थसंचय करण्यासह करोना रुग्णांच्या वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी विचार सुरू केला आहे. दरम्यान, विक्रेते व त्यांच्याकडील कामगारांना प्रवेशासाठी भद्रकाली, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्यावतीने विहित नमुन्यातील पास दिले जाणार आहेत. हे पास दाखवून त्यांना बाजारपेठेत आपापल्या व्यवसायासाठी जाता येणार आहे.

Advertisement

पहा कोणत्या भागात घ्यावे लागणार तिकीट (प्रवेश शुल्क-५ रु. वेळ: एक तास) :

Advertisement
  • सिटी सेंटर मॉल पंचवटी येथील बाजार समिती
  • पवननगर भाजी मार्केट, सिडको
  • अशोकनगर भाजी मार्केट, सातपूर
  • कलानगर भाजी मार्केट, इंदिरानगर

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply