Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. किती ही उन्हाची काहिली; ‘या’ राज्याने मोडले की तब्बल ७६ वर्षांचे रेकॉर्ड..!

दिल्ली :

Advertisement

देशात मार्च महिन्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. मार्च महिन्यात देशात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. 

Advertisement

देशातील उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. होळीच्या दिवशी तर राजधानी दिल्लीत तर तापमानाने ७६ वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट आली आहे.

Advertisement

महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणा या राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश किंवा यापेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबरोबरच भारतीय हवामान विभागाने पूर्वोत्तर भारतातील अनेक भागात पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवत आहे. यंदाच्या उन्हाळ्याने मागील ७६ वर्षांतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. दिल्लीकराना अजून काही काळ या कडाक्याच्या उन्हाळ्यातुन सुटका मिळणार नाही. कारण या भागात उष्ण हवा तसेच तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ३ एप्रिल नंतर उष्णतेत आणखी वाढ होणार आहे.

Advertisement

ओडिशा राज्यही कडाक्याच्या उन्हाळ्यात होरपळत आहे. काल सोमवारी या राज्यातील जवळपास १३ ठिकाणी तापमान ४० अंशापेक्षा जास्त नोंदवले गेले. या तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. ओडिशातील टीटलागढ भागात सोमवारी तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Advertisement

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी धुळीसह जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रतही कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply