Take a fresh look at your lifestyle.

रहाणे, अश्विन, पंत की स्मिथ..; कोण होणार दिल्लीचा कर्णधार?

मुंबई :

Advertisement

आयपीयलचा नवीन हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होणार असून त्यापूर्वीच दिल्ली संघाला जबरदस्त फटका बसला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रात खेळणार नाही. अय्यर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यान जखमी झाला होता. अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे,  यामुळे तो ४ ते ५  महिने क्रिकेटच्या मैदानात परत येऊ शकणार नाहीत.

Advertisement

अय्यरच्या अनुपस्थितीत सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की दिल्ली संघाचा कर्णधार कोण होणार?  पृथ्वी शॉ,  ऋषभ पंत,  आर अश्विन,  स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे हे कर्णधार पदाच्या शर्यतीत आहेत.  अश्विन,  स्मिथ आणि रहाणे यांना आयपीएलमधील कर्णधारपदाचा अनुभव आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.

Advertisement

ऋषभ पंत हा दिल्ली संघाचा उपकर्णधार आहे,  त्याला कर्णधारपदी दिले जाऊ शकते. पंत सध्या विकेटकीपरची भूमिका साकारण्याबरोबरच फलंदाजीच्या विलक्षण फॉर्ममध्ये आहे,  त्यामुळे त्याची कर्णधार पदी वर्णी लागण्याची सर्वाधिक चर्चा आहे. पंतला मैदानात सल्ला देण्यासाठी स्मिथ, अश्विन, रहाणेसारखे ज्येष्ठ खेळाडूही असतील.

Advertisement

दरम्यान, अय्यरचे स्पर्धेतून बाहेर पडणे हा दिल्लीच्या संघासाठी मोठा धक्का आहे. अय्यरने गेल्या हंगामात दिल्ली संघाचे चांगले नेतृत्व केले होते. यामुळे संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. यंदा किताब पटकावण्याचे संघाचे ध्येय असेल. या हंगामात दिल्ली संघ आपला पहिला सामना 10  एप्रिलला खेळणार आहे. दिल्लीची गाठ चेन्नई सुपर किंग्जशी पडणार आहे.

Advertisement

संकलन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply