Take a fresh look at your lifestyle.

‘येथे’ भाजप ३०० जागा जिंकेल; ‘या’ नेत्याने हाणला टोला

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपात जोरदार टक्कर होणार आहे. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. येथे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यावेळी भाजप २०० जागा जिंकणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. यावर तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी जोरदार टीका केली आहे.

Advertisement

सिन्हा यांनी ट्विट करून उपरोधिक टोला लगावला आहे. सिन्हा यांनी, माझ्या माहितीप्रमाणे भाजपा २९४ पैकी ३०० जागा जिकणार असल्याचं उपरोधिक ट्विट केले आहे. ते पुढे म्हणाले की निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा ३० पैकी २६ जागा जिकणार असल्याचा दावा केल्याबद्दल आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. माझ्या माहितीप्रमाणे भाजपा संपूर्ण ३० आणि २९४ पैकी ३०० जागांवर विजय मिळवणार आहे.

Advertisement

दरम्यान, शनिवारी पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगालमध्ये भाजपची भगवी लाट आल्याचे संकेत मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात ३० जागांपैकी २६ जागांवर भाजपला विजय मिळेल आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय बंगालमध्ये २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, या व्यतिरिक्त देशातील केरळ, पॉंडेचेरी आणि तामिळनाडू या राज्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यातही भाजपने जोरदार तयारी केली आहे.  या राज्यात निवडणूक प्रचार सुरू असून पक्षाचे दिग्गज नेते येथे प्रचार करत आहेत. २ मे रोजी या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply