Take a fresh look at your lifestyle.

आता ‘एवढ्या’ वेळेत संपणार डाव; पहा काय झाला आहे निर्णय

दिल्ली :

Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावेळच्या आयपीएल बाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वेळेचे महत्व आहेच त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता २० वी ओवर नव्वद मिनिटात संपणे आवश्यक आहे. याआधी टी २० सामन्यातील शेवटची ओव्हर नव्वदाव्या मिनिटात सुरू होणे आवश्यक होते.

Advertisement

 याबाबत मंडळाने क्रिकेट टीमना मेल पाठवला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, सामन्याच्या वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक डावातील शेवटची ओव्हर नव्वद मिनिटात समाप्त होणे आवश्यक आहे. याआधी २० वी ओव्हर नव्वदाव्या मिनिटात सुरू होणे आवश्यक होते.

Advertisement

यामुळे आता क्रिकेट संघांना प्रत्येक एक तासात सरासरी १४.११ ओव्हर टाकाव्या लागतील. कोणत्याही व्यत्ययाविना सुरू होणाऱ्या सामन्यातील एक डाव ९० मिनिटात समाप्त होणे आवश्यक आहे. उशिराने सुरू होणाऱ्या सामन्यात ठराविक वेळेत २० ओव्हर टाकल्या गेल्या नाही तर यामध्ये प्रत्येक ओव्हरसाठी ४ मिनिट १५ सेकंद अतिरिक्त असू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. क्रिकेट मंडळाने याबाबत फोर्थ अंपायरला काही अधिकार दिले आहेत.

Advertisement

फलंदाजी करणारा संघ विनाकारण वेळ वाया घालवत असेल तर संघाड ताकीद देण्याचा अधिकार या पंचांना देण्यात आला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघामुळे जर गोलंदाजी करणाऱ्या संघास ठराविक वेळेत २० ओव्हर पूर्ण करता आल्या नाही तर अशा परिस्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वेळेत कपात करण्याचा अधिकार फोर्थ अंपायरला राहणार आहे. याबाबत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आणि संघाचे व्यवस्थापक या दोघांनाही माहिती देणे ही जबाबदारी या पंचांची राहणार असल्याचे मंडळाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply