Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाउन : ‘या; काँग्रेस नेत्यानेही व्यक्त केला संताप; पहा नेमके काय म्हटलेय

मुंबई :

Advertisement

राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचा सरकारचा विचार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजपने लॉकडाउनला याआधीच विरोध केला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील या मुद्यावर संताप व्यक्त केला आहे. 

Advertisement

निरुपम यांनी करोना काळात राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की चुकीचे नियोजन आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्याचा जो विचार आहे त्यास आमचा विरोध आहे. याआधी जो लॉकडाउन करण्यात आला होता त्यावेळी राज्यातील आणि देशातील नागरिकाना बेरोजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद पडल्याने व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका, असे निरुपम यांनी एका न्युज चॅनेलशी बोलताना सांगितले.

Advertisement

लोकांनी सावधगिरी बाळगणे आणि लसीकरण हे दोन पर्याय आहेत. मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू केले पाहिजे. मिशन टेस्टिंग बकवास आयडिया आहे. त्याऐवजी नागरिकांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहीजे, पण लॉकडाउन नको असे स्पष्ट मत निरुपम यांनी नोंदवले आहे.

Advertisement

दरम्यान, राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. काही शहरात दवाखान्यात बेड अपुरे पडत आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात येत आहेत. लॉकडाउन करण्याचाही विचार आहे मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. असे असताना लॉकडाउनला मात्र विरोध होऊ लागला आहे. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply