Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनचा झटका, गुलाबाच्या दरवळालाही फटका; पहा काय झालेत परिणाम

पुणे :
करोना विषाणूचा कहर वर्ष झाले तरी कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. लॉकडाऊन होणार या भितीसह लग्नसमारंभ आणि इतर सर्व प्रकारच्या उत्सवांना मोठ्या प्रमाणात साजरा करण्यावर बंदी असल्याने भाजीपाला, कांद्यासह फुलांच्या मार्केटलही मंदीचा झटका बसला आहे.

Advertisement

अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभ, सोहळे, मंदिरांमधील पूजा-अर्चा आणि जत्रा-यात्रा यासह इंक गोष्टीबाबत मर्यादा आणल्याने फुलांची मागणी घटली आहे. सध्या नाशिक आणि पुण्यातील अनेक ठिकाणी गुलाब फुलांच्या एक जुडीसाठी (२० फुले) केवळ १२ ते १५ रुपयांचा भाव मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा हा भाव खूपच कमी आहे.

Advertisement

महाराष्ट्रातून अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, जयपूर, भोपाळ या ठिकाणी माेठ्या प्रमाणात गुलाबाची फुले पाठविली जातात. फेब्रुवारी महिन्यात गुलाब फुलांची जुडी १४० ते १९० रुपयांपर्यंत गेली होती. मार्चमध्ये कोरोनामुळे या जुडीची किंमत थेट १२ ते १५ रुपयांवर आली आहे.

Advertisement

सध्या लॉकडाऊनची भीती आणि कारवाईची धाक यामुळे उत्सवांवर मर्यादा आलेल्या आहेत. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेताना हे आवश्यकही आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने किमान काहीअंशी का होईना मदत देण्याची आवश्यकता असल्याची मागणी अॅड. योगेश गेरंगे यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply