Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांद्याचा आणखीनच वांधा; भाव घसरले आणि करोनाच्या उच्छादाचाही दुष्परिणाम

नाशिक :

Advertisement

केंद्र सरकारने निर्यातबंदी लागू केल्याने घसरत असलेले कांद्याचे भाव आता तर 8-9 रुपये किलोवर येऊन घसरले आहेत. भारताच्या धरसोड वृत्तीमुळे आता भारतीय कांद्याला परदेशातून मागणी नाही. त्यातच देशांतर्गत मार्केटमध्ये मागणीच्या तुलनेत आवक जास्त असतानाच करोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न आणि कार्यक्रम बंदीसह आता बाजार समित्या बंद झाल्याने कांद्याचा आणखीनच वांधा झाला आहे.

Advertisement

सध्या लासलगाव या कांदा पॉकेटच्या महत्वाच्या बाजार समितीमध्ये बेस्ट क्वालिटी कांद्याला 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. त्यातच वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 5 एप्रिलपर्यंत लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.

Advertisement

लाल कांद्यासोबतच उन्हाळ कांद्याचीही आवक वाढल्याने लासलगाव, पिंपळगाव, कळवण, देवळा, बागलाण, उमराणे, मालेगाव, वणी, दिंडोरी, सिन्नर, नायगाव, येवला बाजार समितीमध्ये कांदा भाव कमी होत आहेत. महाराष्ट्रातील कांद्यासह मध्यप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल येथील कांदाही जोरात बाजारात येत आहे. परिणामी लाल कांदा जोपर्यंत मार्केटमध्ये आहे तोपर्यंत बाजारभावात वाढ होणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

काही भागात पाणी कमी पडल्याने कांदा किंवा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने लवकरच कांदा काढला जात आहे. पैशांची अडचण असल्याने शेतकऱ्यांना आहे त्या परिस्थितीत कांदा काढून विकायला आणावा लागत असल्याने दरावरही दुष्पपरिणाम होत आहेत.

Advertisement

मागील 2 दिवसांचे कांदा बाजारभाव असे (रुपये / क्विंटल) :

Advertisement

*(ता.क. होळी आणि धुलीवंदन यामुळे अनेक बाजार समित्या बंद होत्या)

Advertisement
दिनांकजिल्हाजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
30/03/2021पुणे100015001250
30/03/2021पुणेलोकल105012001125
29/03/2021अहमदनगरउन्हाळी3751300900
29/03/2021पुणेलोकल120013001250
29/03/2021साताराउन्हाळी60012511130

संपदान : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply