अहमदनगर :
उत्तर नगर जिल्ह्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील कुरघोडीचे डावपेच जोमात असतात. त्यांचे कार्यकर्तेही एकमेकांना किंवा नेत्यांना लक्ष्य करीत असतात. आताही धुळवडीच्या निमित्ताने विखेंच्या कार्यकर्त्यांनी थोरातांना लक्ष्य केले आहे.
थोरात यांची निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे उद्दिष्ट असल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्या बातमीत कालव्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ४७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे थोरात यांनी म्हटलेले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले महसूलमंत्री थोरात हे महाविकास आघाडीमधील एक महत्वाचे नेते आहेत. यांच्यामुळे या भागातील निळवंडे कालव्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.
मात्र, यापूर्वीही अनेकदा या कालव्यासाठी निधी मंजूर होणार अशाच बातम्या येऊन गेलेल्या आहेत. स्थानिक राजकारणात हा महत्वाचा मुद्दा आहे. दुष्काळी तळेगाव आणि इतर भागाला दिलासा देणारी ही योजना निवडणुकीत कळीचा मुद्दा असते. त्याचमुळे विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी आता हीच बातमी पाठीमागे ठेऊन पुढे महसूलमंत्री थोरात यांचा फोटो टाकून ‘कशी चाट मारली’ असे मनोमन विचार करण्याच्या पोजमधील कार्टून शेअर केले आहे.
या कार्टूनमध्ये एक कार्यकर्ता आणि थोरात साहेब हसत असून शेतकरी मात्र काहीच समजत नसल्याने प्रश्नार्थक होऊन डोक्याला हात लावीत आल्याचे दाखवलेले आहे. विखे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुरा ना मनो होली है असे जोडून सोशल मिडीयामध्ये हे कार्टून व्हायरल केलेले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!