Take a fresh look at your lifestyle.

उपवनसंरक्षक बालाच्या कोठडीत वाढ; पहा कशासाठी पोलिसांनी मागितला वाढीव पीसीआर

अमरावती :

Advertisement

हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार बाला याच्या पोलीस कोठडीत (पीसीआर) वाढ करण्यात आलेली आहे. प्रथम न्यायाधीशानी 30 मार्चपर्यंत त्याला वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

बाला याला रविवारी दुपारी 2 वाजता दरम्यान चिखलदऱ्यातील त्याच्या कार्यालयात व शासकीय निवासस्थानी नेण्यात आले होते. तेथे त्याच्याकडून लॅपटॉप, पेन ड्रॉइव्ह आणि शासकीय दस्तऐवज जप्त केले. तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांचेही जबाब घेण्यात आलेले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हया कर्तव्यावर असताना त्यांना मध्यरात्री जंगलात बोलावत होता, तर कित्येक वेळा त्यांना त्याने जंगलातून फोटो सेल्फी काढून पाठवायला सांगितले होते, असे सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे. त्यानुसार पोलिसांनी बाला याला जंगलातील त्या घटनास्थवर नेले होते.

Advertisement

Krushirang on Twitter: “#DeepaliChavan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @INCMaharashtra @prithvrj @OfficeofUT @AjitPawarSpeaks अहो, याकडेही लक्ष द्या की.. का..? यात इंटरेस्ट नाही की काय कोणाचाही..? https://t.co/cFDEedNAO4 #Mahaforest @MahaForest” / Twitter

Advertisement

सुसाईड नोटमध्ये इतरही काही वयक्तींची नावे आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी सात दिवसाचा वाढीव पीसीआर देण्याची मागणी  सरकार पक्षाने केली होती. तसेच एसडीपीओ पूनम पाटील यांनी म्हटले आहे की, चव्हाण यांच्या मोबाईलमध्ये आरोपीच्या संभाषणाची आँडिओ क्लिप सापडली आहे. जप्त मोबाईलमधील डीसीआर मागविला आहे. त्याची तपासणी करून आणखी काही पुरावे मिळतील असे दिसते. सुसाईड नोटमध्ये घटनेचा कालावधी हा एक वर्षापासून आहे. वर्षभरापासून आरोपी दिपाली चव्हाण यांना मानसिक त्रास आणि वेळोवेळी अपमानित करत असल्याचे नमूद आहे. त्या वेगवेगळ्या घटना स्थळावर जाऊन तेथील उपस्थितांचे जबाब घेणे सुरू आहे. त्यासाठीही वाढीव पीसीआर मागण्यात आला होता.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply