Take a fresh look at your lifestyle.

मेळघाटच्या दलदलीत अडकल्या होत्या दिपाली चव्हाण; आणखीही येथे काहीजण अडकलेले तर नाहीत ना?

अमरावती :

Advertisement

मेळघाट ही अशी दलदल आहे की ज्यात आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर नाही जाऊ शकत. याच दलदलीत मी अडकत चालले आहे, असे म्हटलेले आहे आत्महत्या केलेल्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी. त्यांनी हे पत्र लिहिलेले आहे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांना.

Advertisement

दिपाली चव्हाण या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येने अवघ्या महाराष्ट्राला चटका लावला आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चार पानी पत्र रेड्डी यांना लिहिले आहे. त्यांनी रेड्डी यांच्याकडे आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडे यापूर्वीच निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याच्याही तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा व वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे दिसते. त्यांच्या पत्रात त्यांनी याचा सविस्तर घटनाक्रम लिहिलेला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#DeepaliChavan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @INCMaharashtra @prithvrj @OfficeofUT @AjitPawarSpeaks अहो, याकडेही लक्ष द्या की.. का..? यात इंटरेस्ट नाही की काय कोणाचाही..? https://t.co/cFDEedNAO4 #Mahaforest @MahaForest” / Twitter

Advertisement

एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा हे फ़क़्त आत्महत्येचे प्रकरण न राहता थेट मेळघाट या जंगलातील वन विभागाच्या साम्राज्याचे पुरावे उघड करणारा महत्वाचा घटक बनले आहे. कारण, दिपाली चव्हाण यांनी पुढे चवथ्या पानावर म्हटलेले आहे की, मला माहित आहे की, इतकं लिहून देखील तुम्ही त्याचे काहीच बिघडवू शकणार नाही. कारण, सगळ्यांना माहित आहे की, तुमचाच त्याच्या डोक्यावर हात आहे.

Advertisement

एकूणच या घटनाक्रमात रेड्डी यांच्याकडेही थेट दिपाली चव्हाण यांच्या पत्राने बोट दाखवलेले आहे. दरम्यान रेड्डी यांनी नागपूर येथे मुख्यालयात झालेली बदली रद्द करण्यासाठी राज्याच्या वनखात्याला पत्र लिहून चॅलेंज केले आहे. माझी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नाही. याबाबत पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

 मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज करून त्याद्वारे मोठी माया जमवण्याचा मोठा उद्योग मेळघाट भागात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. लोकमत वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटलेले आहे की, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांची अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेशित केले आहे. परंतु, रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement

रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सन २०१७ मध्ये रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकपदी रुजू झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले. आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता राज्यातील अन्य आयएफएस लॉबीला चॅलेंज करून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. बढती झाल्यानंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोह त्यांना दूर करू शकला नाही, असेही बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

बातमीत पुढे म्हटलेले आहे की, रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी भंग केला आहे. केंद्र व राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात वनसंवर्धनाचा फज्जा उडवीत पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी रेड्डी हे बदलीला विरोध करीत आहेत.

Advertisement

अशा पद्धतीने अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यांचे नेमके काय या भागात किती आणि कुठे लागेबांधे होते यावरही आता चर्चा सुरू झालेली आहे. स्थानिकांनी याप्रकरणी आंदोलन करून पोस्टर लावून होळीचे दहन केले. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाच्या निमित्ताने नेमके काय पुढे येणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

टीम कृषीरंग आता वन विभागातील अनागोंदी आणि भ्रष्टाचार यावर फोकस असलेल्या न्यूज देण्यासाठी तयार आहे. आपल्याकडे वन विभाग (किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागाची) आणि त्यामधील अशी कोणतीही पुरावे आणि कागदपत्र असल्यास आम्हाला या krushirang@gmail.com ईमेलने हे सर्व पाठवा. आपल्या नावासह किंवा आपली इच्छा असल्यास नाव कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीनेही आम्ही त्या सर्व प्रकरणांना प्रसिद्धी देऊ. *(मेलमध्ये आपण स्पष्ट करावे की, न्यूज तुमच्या नावासह प्रसिद्ध करावी किंवा नाही.)

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply