Take a fresh look at your lifestyle.

कडाक्याचा उन्हाळा : येथे दिलाय उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा आणि काळजी घ्या

मुंबई :

Advertisement

राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यभरात पारा वाढलेला दिसत आहे. विदर्भात तर कडाक्याचे ऊन पडत असून येथे ३० मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी वाढ होत आहे. काही भागात ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. मराठवाडा, विदर्भ या भागातील तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. ३० मार्च व ३१ मार्च रोजी तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात तापमान वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून या काळात तापमान ४२ अंशांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. यावेळचा उन्हाळा मागील वर्षापेक्षा जास्त तापदायक होण्याची शक्यता आहे. देशाच्या अन्य भागातही मार्च महिन्यातच मे महिन्यातील भयानक उन्हाळ्याचा अनुभव घेतला जात आहे.

Advertisement

राजस्थान राज्यातील काही जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. या राज्यात सर्वाधिक तापमान जैसलमेर या जिल्ह्यात नोंदवण्यात आले. तसेच राज्यातील अनेक शहरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस आणि यापेक्षा जास्त नोंदवले गेले. यावेळी देशात करोनाचे संकट आहे. करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा नागरिकांना जास्तच तापदायक ठरणार आहे.

Advertisement

संपादन :  मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply