Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘या’ राज्यांत बिअरची बंपर विक्री; पहा काय आहे नेमके कारण

दिल्ली :

Advertisement

गत वर्षात करोना महामारीमुळे देशातील उद्योग व्यवसायांवर मोठे संकट कोसळले होते. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे तर अनेक उद्योग बंद पडले. नागरिकांचे नोकऱ्या गेल्या तसेच कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. मात्र, त्यानंतर आता अनेक क्षेत्रांमध्ये उलाढालींचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोना पुन्हा वाढू लागला आहे. अशात देशातील अनेक राज्यांत बिअरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

गेल्या वर्षी कोविड १९ साथीच्या आजारामुळे बिअरच्या विक्रीवर परिणाम झाला होता. परंतु आता मात्र, राज्य सरकारांच्या उत्पादन शुल्क धोरणांचा बिअर उद्योगावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यांनी महसूलातील नुकसान भरुन काढण्यासाठी उत्पादन शुल्क धोरणात बदल केले आहेत.

Advertisement

पूर्वेकडील राज्यांमध्ये विशेषत: पश्चिम बंगालमध्ये बिअर उद्योग ५० टक्के दराने वाढत आहे. यामागचे कारण असे आहे की ड्युटी स्ट्रक्चरमध्ये केलेल्या बदलांमुळे किंमती कमी होत आहेत. करांच्या अनुकूलतेमुळे करोना काळातील बिअर विक्री २०१९ च्या पातळीवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशात ५०० मिलीलीटर बिअर कॅनचे उत्पादन शुल्क ७० टक्के आहे. आता त्यात सुमारे एक तृतीयांश घट झाली आहे. टॉप ब्रँडची ५०० मिली कॅन आता ११० रुपयांना उपलब्ध होणार आहे, यापूर्वी किंमत १३० रुपये असायचे. किरकोळ परवान्याच्या नूतनीकरणासाठी फी वाढवण्याचा प्रस्तावही राज्याने प्रस्तावित केलेला नाही. घाऊक व किरकोळ मार्जिनही वाढले आहेत. प्रत्येक तिमाहीत विक्रीत सुधारणा झाली असून डिसेंबर तिमाहीत विक्री मागील वेळेपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी कमी आहे. कोरोना उपकर माफ केलेल्या राज्यांमध्ये बिअर विक्रीत सुधारणा झाली आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply