Take a fresh look at your lifestyle.

वाझेप्रकरणी आणखी ट्विस्ट; ‘त्या’ अधिकाऱ्याचेही नाव आलेय रडारवर, पहा नेमका काय झालाय प्रकार

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची कार ठेवण्यासह मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी सचिन वाझे यांच्या प्रकरणात आणखी नवीन माहिती पुढे आलेली आहे. नव्या माहितीनुसार या प्रकरणातील एका कारचे पुरावे गायब करण्याचा कारनामा आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

Advertisement

पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काझी यांच्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आल्याने आता खळबळ उडाली आहे. हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचे काम वाझे याच्या टीमने केल्याचे यामुळे पुढे आलेले आहे. काझी मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर येथे असलेल्या बंटी नावाच्या एका गॅरेजमध्ये गेल्यावर त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला होता. तेथील सावंत नावाच्या व्यक्तीलाही त्यांनी चौकशीसाठी नेले होते. मात्र, याची कुठेही अधिकृत नोंद केलेली नाही.

Advertisement

मुंबई क्राईम ब्रांचच्या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत याबाबतची नोंद नाही. बंटीच्या गॅरेजमध्ये वाझे टीमने गाड्यांसाठी विविध प्रकारच्या बनावट नंबर प्लेट बनवल्या होत्या. या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये या करता पुरावे नष्ट केले जात होते. काझी हे यादरम्यान सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. त्याचे फुटेज मिळाल्याने आता काझी काळजी यांची चौकशी देखील करण्यात आली आहे.

Advertisement

बंटी नावाच्या गॅरेजमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि दुकानातील सर्व रेकॉर्डसह विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले होते. हे सर्व पुरावे त्यांनी नष्ट केल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply