Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर पोटनिवडणूक : अवताडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने दिला ‘हा’ उमेदवार..!

सोलापूर :

Advertisement

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनही आपला उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघात पक्षाने भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दुपारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, भाजपने याआधी समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Advertisement

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. विरोधी भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अवताडे यांनी याआधी दोन वेळेस या मतदारसंघातून प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर दिली आहे. त्यांच्या रुपाने भाजपने राष्ट्रवादी समोर आव्हान उभे केले आहे.

Advertisement

दुसरीकडे भगिरथ भालके यांनाच उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्यांच्या नावास पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. अन्यही काही नावे चर्चेत होती. त्यामुळे उमेदवार कोण असेल याबाबत निर्णय घेण्यात अडचणी येत होत्या. अखेर पक्षाने भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली.

Advertisement

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. दरम्यान, मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्यानेही समस्या वाढल्या आहेत. महाविकास आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेने येथे उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे भाजपने मात्र परिचारक गटाची मनधरणी करत समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply