Take a fresh look at your lifestyle.

नगर-बीड रेल्वेसाठी निधी मंजूर; मिळणार ‘एवढे’ कोटी..!

अहमदनगर :

Advertisement

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने पुढील टप्प्यातील निधी मंजूर केला आहे. या रेल्वे मार्गासाठी ५६.९८ कोटी रुपये रेल्वेस देण्यास मंजुरी मिळाली आहे. या रेल्वे मार्गासाठी याआधी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत आहे. हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून होत आहे.

Advertisement

केंद्र सरकार देईल तेवढा निधी राज्य सरकारने द्यायचा असे ठरले आहे. अलीकडे काही कारणांमुळे राज्य सरकारच्या हिश्श्याचाा निधी न मिळाल्याने रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारने निधी दिला. यानंतर आता पुन्हा पुढील टप्प्यातील निधी मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण दोन हजार ८२६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यातील पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने देणे आहे.

Advertisement

प्रकल्पाच्या खर्चात राज्य सरकारच्या हिश्श्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०२०-२१ साठी रेल्वेने मागणी केलेल्या रकमेपैकी आणखी ५६.९८ कोटी रुपये निधी रेल्वेस वितरीत करण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम २०१९ मध्येच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, ते होऊ शकले नाही. निधी आणि तांत्रिक अडचणींमुळे ते रखडले नाही, तर यावर्षी तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Advertisement

दरम्यान, या वर्षातही देशातील करोनाचे संकट कायम असून दिवसेंदिवस आधिक गडद होत आहे. दररोज रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारसमोर ताण वाढला आहे. करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यावरच सध्या लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply