Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर पोटनिवडणूक : अखेर भाजपने दिला ‘हा’ उमेदवार..!

सोलापूर :

Advertisement

राज्याचे लक्ष असलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवाराची घोषणा केली आहे. या मतदारसंघात पक्षाने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. अवताडे यांनी याआधी दोन वेळेस या मतदारसंघातून प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

Advertisement

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांसाठी विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोण उमेदवार देणार हे पाहून भाजप आपला उमेदवार ठरवणार होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे आज अखेर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

Advertisement

या मतदारसंघात राष्ट्रवादीकडूनन निवडणूक लढण्यास अनेक जण प्रयत्नात आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न पक्षासमोर आहे. यामुळेच पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लवकरच उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्यानेही समस्या वाढल्या आहेत. महाविकास आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेने येथे उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

दुसरीकडे भाजपने मात्र परिचारक गटाची मनधरणी करत समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अवताडे हे मागील पाच वर्षांपासून भाजपचे काम करत आहेत. अवताडे यांनी २०१४ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर, २०१९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी लक्षणीय मते घेतली होती.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply