Take a fresh look at your lifestyle.

वन विभागाचा गोंधळ : चव्हाणांच्या आत्महत्येने डिपार्टमेंट आले रडारवर; शेकडो कोटींच्या भ्रष्टाचारालाही तोंड फुटणार..!

अहमदनगर :

Advertisement

गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. परिणामी या विभागातील अंतर्गत राजकारण, भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणेही रडारवर आलेली आहेत. आता यानिमित्ताने या विभागामधील यंत्रसामग्री खरेदी आणि कोणतेही काम न करता बिलामध्ये केला जाणारा गोंधळ यांचीही चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणामुळे पवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने या विभागातील नॉनमहाराष्ट्रीयन अधिकारी आणि महाराष्ट्रीयन अधिकारी यांच्यातील वादालाही तोंड फुटले आहे.

Advertisement

या विभागात नागपूर येथील काही कंपन्यांवर वरिष्ठ अधिकारी मेहेरबान असून त्यांच्याच यंत्र आणि वस्तूंचा पुरवठा करून आपापले खिसे भरण्यात विभागातील उच्चपदस्थ मश्गुल असल्याचीही चर्चा सुरू झालेली आहे. एकाच दिवसात स्पेसिफिकेशन बदलणे, नियम धाब्यावर बसवून आवडत्या कंपनीलाच खरेदीसाठी सहकार्य करणे, कमी क्षमतेची उपकरणे खरेदी करताना नको त्या गोष्टींना महत्व देऊन दर्जेदार यंत्रसामग्री डावलणे, वनाला ठरवून आग लावून पुरावे नष्ट करणे, सोलर उपकरणे बसवण्याचा घोटाळा करणे, आगीच्या घटना टाळण्याऐवजी थेट तशा घटनांचा लाभ घेऊ प्रतिवर्षी तीच-ती कामे करून घेऊन कोट्यावधी रुपये खिशात घालणे अशा पद्धतीचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे.

Advertisement

टीम कृषीरंग आता वन विभागातील अनागोंदी आणि भ्रष्टाचार यावर फोकस असलेल्या न्यूज देण्यासाठी तयार आहे. आपल्याकडे वन विभाग (किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागाची) आणि त्यामधील अशी कोणतीही पुरावे आणि कागदपत्र असल्यास आम्हाला या krushirang@gmail.com ईमेलने हे सर्व पाठवा. आपल्या नावासह किंवा आपली इच्छा असल्यास नाव कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीनेही आम्ही त्या सर्व प्रकरणांना प्रसिद्धी देऊ. *(मेलमध्ये आपण स्पष्ट करावे की, न्यूज तुमच्या नावासह प्रसिद्ध करावी किंवा नाही.)

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply