Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून मुंबईसाठी एकत्र या..’; पहा कोणत्या काँग्रेस नेत्याने म्हटलं असं

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण आहेत. राज्यात रविवारी होळीच्या दिवशी ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध आधिक कठोर केले जात आहेत. लॉकडाउनचे संकटही घोंगावू लागले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलींद देवरा यांनी केंद्र, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेस महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.

Advertisement

राज्यात रविवारी तब्बल ४० हजार ४१४ रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईत ६ हजार ९२३ नव्या रुग्णांची नोंद घेण्यात आली. मुंबईत रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने निर्बंधही वाढत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात निर्बंध वाढल्यास त्याचा अर्थचक्रावर होणाऱ्या परिणामांकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे त्यांनी ट्विटद्वारे लक्षात आणून दिले आहेत.

Advertisement

करोना रुग्णसंख्येपैकी १० टक्के नवीन रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. तर त्याचबरोबर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६ टक्के वाटा मुंबईचा आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेनं एकत्र यायला हवं. तसेच प्रत्येक प्रौढ नागरिकाचे लवकरात लवकर लसीकरण करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातील करोना चाचण्यांमधील पॉजिटीव्हीटीचे प्रमाणही जास्त आहे. देशात आतापर्यंत २४ कोटींपेक्षा जास्त नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ५ टक्के अहवाल पॉजिटीव्ह आले. मात्र, महाराष्ट्रात हे प्रमाण २२.७८ टक्के आढळून आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply