Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : गडचिरोलीमध्ये पोलीस-नक्षलीमध्ये चकमक; पाच जण ठार..!

नागपूर :

Advertisement

विदर्भातील गडचिरोली या नक्षलप्रभवित जिल्ह्यात पोलिसांना आज मोठी कामयाबी मिळाली आहे. चकमकीत पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना ठार केले आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.

Advertisement

नक्सल रेंजचे डीआयजी संदीप पाटील यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खोबरामेंधा वनपरिक्षेत्रात पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. या भागात झालेल्या चकमकीत पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

Advertisement

हा भाग नक्षलग्रस्त असून रेंजचे डीआयजी डीआयजी संदीप पाटील यांनी सांगितले आहे की, खुरखेडा परिसरातील खोबरामेंधा वनक्षेत्रात पोलिस कर्मचार्‍यांशी नक्षलवाद्यांची चकमकी झाली. यात पोलिस कर्मचार्‍यांनी पाच नक्षलवादी ठार केले.

Advertisement

ANI on Twitter: “Maharashtra: Five Naxals killed in an encounter with police in Khobramendha forest area of Kurkheda in Gadchiroli district, says Sandip Patil, DIG, Naxal Range” / Twitter

Advertisement

पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. दि. 24 मार्च रोजी छत्तीसगडच्या नारायणपूर या भागात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बसवर हल्ला केला. यात पाच सैनिक शहीद झाले. वास्तविक, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाची बस लँडमाइनमध्ये उडविली.

Advertisement

त्यानंतर नक्षलप्रभावित सर्व भागातील पोलीस आणि निमलष्करी जवान अलर्ट मोडवर होते. त्यातच हे मोठे यश मिळाल्याने पोलिसांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली आहे. या घटनेत पोलिसांचे कोणी जखमी झाले किंवा नाही, हे समजू शकलेले नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply