Take a fresh look at your lifestyle.

म्हणून आंबा उत्पादकांना बसलाय फटका; पहा नेमका काय होणार दुष्परिणाम

पुणे :

Advertisement

यंदा उन्हाळा लवकरच सुरू झाल्याचा फटका शेतमालाच्या उत्पादनावर झालेला आहे. तसाच फटका आंबा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Advertisement

यंदाच्या हंगामात एकाच आंब्याच्या झाडाला दोन ते तीन टप्प्यात मोहोर आला आहे. त्यातही प्रतिकूल वातावरणामुळे काही मोहोर जळून गेला आहे. काही आंब्याला फळधारणा चांगली झाली आहे. मात्र, त्याची टक्केवारी तुलनेने कमी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर टिकला नसल्याचे केशर आंबा उत्पादकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

Advertisement

केसर, हापूस, राजापुरी, लंगडा, दशेरी, तोतापुरी अशा अनेक प्रसिद्ध जातीचे आंब्याचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. त्या सर्वच आंबा उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील उशिरा येणारा अंबा थेट पावसाळ्यात आल्यावर तर त्याला ग्राहक मिळणे दुरापास्त होणार आहे.

Advertisement

पहिल्या टप्प्यातील फळ चांगले आले व त्यानंतर मोहोर जळाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील फळ गळती झाली व आता तिसऱ्या टप्प्यातील मोहोर उशिरा आल्याने सीजन संपल्यावरच हा आंबा बाजारात येईल असे चित्र आहे.

Advertisement

गावठी जातीच्या गोड वाणातून सुद्धा अल्पभूधारक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. गावठी कैऱ्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते. त्यांना सुद्धा बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने कमी जास्त प्रमाणात कैरीचे उत्पन्न आले. अपेक्षित उत्पन्न न आल्याने लोणच्यासाठी लागणारी कैरी सुद्धा महागण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply