Take a fresh look at your lifestyle.

मतदानचा वाढता टक्का; कोणाला धक्का, पहा ट्रेंड काय सांगतोय

दिल्ली :

निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल असतो, असा सर्वसाधारण समज आहे. बऱ्याच वेळेस हे खरेही ठरले आहे. आता देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये दोन राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे.

Advertisement

त्याचबरोबर ६ एप्रिल रोजी एका राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत, गेल्या दोन दशकातील राज्यांमधील निवडणुकांशी संबंधित निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सरकार स्थापनेचे किंवा सत्तेत परत जाण्याचे स्पष्ट चित्र दिसते. आकडेवारीनुसार, ज्या राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तेथे सत्तेत बदल झाला आहे असे दिसते.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी ८० टक्के मतदान झाले. त्याचवेळी आसाममध्ये ७० टक्के मतदान आहे. १९९१ ते २०२१ या दोन दशकातील आकडेवारी पाहिल्यास, सत्ता परिवर्तन झाल्याचे दिसते. २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता आली तेव्हा राज्यात ८४.३३ टक्के मतदान झाले होते. तर यापूर्वी राज्यात ८१.९७ टक्के मतदान होते.

Advertisement

सन  २०१६ मध्ये झालेल्या सत्ता बदलादरम्यान आसाममध्ये मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली. त्यावर्षी भाजपाची सत्ता आल्यावर मतदानाची टक्केवारी ८४ टक्के होती. तर मागील तीन विधानसभा निवडणुकीत ते केवळ ७५ टक्के होते. सत्तेत बदल होणात महिला मतदानाचे प्रमाणही पुरुषांच्या तुलनेत जास्त होते.

Advertisement

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दक्षिणेकडील राज्यांमध्येही हा कल दिसून येतो. २००१ मध्ये तामिळनाडूमधील मतदान ५९ टक्के होते, २०११ मध्ये यामध्ये वाढ होऊन ७८ टक्के झाले. स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे यावर्षी द्रमुकला सत्तेबाहेर केले गेले. केरळमध्येही एलडीएफने ७७ टक्के मतदानानंतर २०१६ मध्ये कॉंग्रेसला सत्तेबाहेर जाण्याचा मार्ग दाखविला होता.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply