Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो, कोट्यावधी एजबार वाहने रस्त्यावर; पहा काय आहेत त्याचे दुष्परिणाम

मुंबई :

Advertisement

देशभरात दररोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने रस्त्यावर येत असली तरी अजूनही जुनी वाहने मोठ्या संख्येने आहेत. पंधरा वर्षांपेक्षा जुनी असणारी तब्बल चार कोटी वाहने आजही रस्त्यांवर चालत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. देशात गेल्या काही वर्षांपासून वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

Advertisement

देशात चार कोटी जुनी वाहने रस्त्यावर धावत आहेत. विशेष म्हणजे, यातील दोन कोटी वाहने तर वीस वर्षे जुनी आहेत. या वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. त्यामुळे राज्यांनी जुन्या वाहनांवर हरित कर आकारावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय सडक व राजमार्ग मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये कर्नाटक राज्यात सर्वाधिक जुनी वाहने आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि दिल्ली राज्यांत जुन्या वाहनांची संख्या जास्त आहे. तर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाणा आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश केलेला नाही. या राज्यांतील जुन्या वाहनांची माहिती संकलित केली जात आहे.

Advertisement

माहिती मिळाल्यानंतर या राज्यांची आकडेवारी प्रसिद्ध होईल. त्यामुळे जुन्या वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. या जुन्या वाहनांवर हरित कर आकारण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात राज्यांना देण्यात आला आहे. राज्यांनी या प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर या पद्धतीने कर आकारणी करण्यास सुरुवात होईल. सद्यस्थितीत राज्यांकडून वेगवेगळ्या दरांनी हरित हरित कर घेतला जात आहे.

Advertisement


दरम्यान, या जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. मोठ्या शहरांत प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे या समस्येला आळा घालण्याच्या उद्देशाने या जुन्या वाहनांवर हरित कर आकारण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत. यामध्ये आठ वर्षांहून जुन्या वाहनांच्या नुतनीकरणा वेळी १० ते २५ टक्क्यांपर्यंत कर आकारला जाणार आहे. यामुळे प्रदूषण करणारी वाहने मोडीत काढली जाऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply