Take a fresh look at your lifestyle.

‘सुंदर माझे कार्यालय’मुळे झेडपी झाली गोंडल; पहा नेमका काय झालाय बदल

बीड / औरंगाबाद :

Advertisement

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागात ‘सुंदर माझे कार्यालय’ ही चळवळ उभी केली आहे. त्यामुळे अनेक कार्यालये सुंदर आणि आकर्षक बनली आहेत. त्यात आता बीड जिल्हा परिषदेचाही नंबर लागला आहे.

Advertisement

रंगरंगोटी, वृक्षारोपण, रेकॉर्ड टापटीप ठेवल्याने बीड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा लूक एकदम गोंडल झाला आहे. रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवल्याने असलेली अस्वच्छता, अस्ताव्यस्त पडलेले रेकॉर्डचे गठ्ठे, रंगरंगोटीअभावी उदास दिसणाऱ्या इमारती, मोडकळीस आलेल्या टेबल खुर्च्या, कार्यालय परिसर असुशोभित असे वातावरण गायब होऊन आता जिल्हा परिषद ‘सुंदर माझे कार्यालय’ बनली आहे.

Advertisement

यामुळे बदल झालेले मुद्दे असे :

Advertisement
  1. काही कार्यालयांनी आपल्या कार्यालयांसमोरच्या जागेत छोट्या बागाही फुलवल्या आहेत.
  2. प्रशासकीय इमारत, ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग, अध्यक्ष व सर्व सभापतींची दालनांची रंगरंगोटी केली आहे.
  3. आवश्यकतेनुसार गणवेश, गळ्यात ओळखपत्र, व्यवस्थित रेकॉर्डचे गठ्ठे ठेवणे यामुळे कार्यालयालाही कॉर्पाेरेट लूक आला आहे.
  4. माध्यमिक शिक्षण विभागासमोरच्या जागेचा चांगला उपयोग करत तिथे विविध प्रकारची फुलझाडे लावली. जाळीचे कुंपण करून संरक्षण केले आहे. पाण्याची व्यवस्थाही केली आहे.
  5. सर्व विभागांच्या भिंतींवर विविध प्रकारचे सुविचार, जागृती करणारे घोषवाक्य आणि त्या विभागांच्या योजनांची माहिती देणारा मजकूर आहे.
  6. रंगरंगोटीमुळे भिंती बोलक्या झाल्या अाहेत. पूरक चित्रेही रेखाटली गेल्याने नजरेला चित्र छान वाटण्याबरोबरच जागृतीही होत आहे.

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply