Take a fresh look at your lifestyle.

बॅकयार्ड पोल्ट्री : म्हणून ग्रामीण महिला व तरुणांनीही करावा ‘हा’ जोडधंदा; वाचा रोजगार देणारी माहिती

परसातील कुक्कुटपालन अर्थात बॅकयार्ड पोल्ट्री यामध्ये वर्षानुवर्षे महिलाच काम करीत आहेत. शेळ्या आणि जोडीला चार-दहा कोंबड्या यांचे पालन करून आताही लाखो गरीब कुटुंबीय जगतात. महिलाच त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांना यातल्या बहुसंख्य गोष्टी माहिती आहेत. मात्र, आता कालची गरज लक्षात घेऊन रुरल वुमेन्स एटीएम असलेल्या या छोटेखानी पोल्ट्री व्यवसायाला वाढवण्याची गरज आहे.

Advertisement

अशा पद्धतीने बॅकयार्ड पोल्ट्री व्यवस्थापन करताना लक्षात घेण्याचे मुद्दे असे :

Advertisement
  • हा घरबसल्या करता येण्याजोगा मस्त जोडधंदा आहे. यासाठी आपल्याकडे असेल त्या पद्धतीने गुंतवणूक करावी आणि सुरुवात करावी.
  • मजूर अथवा इतर कोणाचीही खास मदत न घेता एकजण महिला किंवा पुरुष  ५०० पक्ष्यांपर्यंत याचे सहजपणे नियोजन करू शकतो.
  • शेळ्यांचा गोठा असेल आणि त्यात जर गावरान पद्धतीने कोंबडीपालन केले तर गोचीड नियंत्रण होण्यासह पूरक उत्पन्न मिळते.
  • महिलांना स्वच्छता आणि संगोपन याचा अनुभव असतो. तसेच त्यांना याची गोडी असते. त्यामुळे त्या असा व्यवसाय सहजपणे यशस्वी करू शकतात.
  • पिल्ले, तलंगा, कोंबड्या आणि अंडी या कोणत्याही टप्प्यावर यातून उत्पन्न मिळते.
  • जास्त अंडी उत्पादन घेऊन विक्रीसह काही अंडी घरातील मुळे, ज्येष्ठ यांच्यासह सर्वांना पोषण आहार देण्यासाठी खायला मिळतात.
  • प्रथिनांचा उत्तम सोर्स असलेल्या अंडी व चिकन यामुळे शरीराला योग्य ते घटक मिळतात. तसेच रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) वाढते.
  • ब्रॉयलर कोंबड्या किंवा पिंजऱ्यातील पांढऱ्या अंड्यांपेक्षा गावरान कोंबड्या, गावरान पद्धतीने संगोपन केलेल्या कोंबड्या आणि केज फ्री एग (हॅपी अंडी) यांना जास्त मागणी आहे.
  • गावरान कोंबड्या वर्षाला ६०-७० अंडी देतात. मात्र, आता केंद्रीय कुक्कुट विकास संस्था आणि इतर सरकारी व खासगी संस्थांनी वार्षिक १५०-१८० अंडी देणाऱ्या चांगल्या संकरीत जाती विकसित केलेल्या आहेत.
  • घरातील शिळे अन्न आणि अन्नधान्याचे मात्रे यावरही कोंबड्यांचे चांगले संगोपन होते. एकूणच टाकाऊ वाटणाऱ्या मात्र पोषक घटकांपासून हा व्यवसाय आपण करू शकतो.

संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply