Take a fresh look at your lifestyle.

‘केम छो’मुळे देश बुचकळ्यात; नेमक ‘अडाणी’ कोण, हाच बनलाय कळीच मुद्दा

पुणे :

Advertisement

भास्कर समूहाच्या ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे विश्वासू माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याची ब्रेकिंग न्यूज दिल्याने अवघा देश बुचकळ्यात पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा दावा फेटाळला आहे, तर भाजपने सूचक वक्तव्य करून संशय आणखी वाढवला आहे.

Advertisement

पवार, शाह आणि पटेल यांची भेट अहमदाबादेतील अदानी शांतिग्राम विश्रामगृहावर झाल्याचे वृत्त आहे. यामधील अदानी समूहाचे विश्रामगृह हा महत्वाचा दुवा बनला आहे. शेतकरी कायद्याचा सर्वाधिक लाभ अदानी समूहाला होणार असल्याचे म्हटले जात आहे. शेतकरी आंदोलकांनी यावर अनेकदा कागदपत्रे दाखवून दावा केला आहे. तर, पवार यांच्यासह राष्ट्रवादी खासदारांनी त्या कायद्यांवर संसदेत अळीमिळी भूमिका घेतली होती.

Advertisement

त्यामुळेच नेमक ‘अडाणी’ कोण, असाच मुद्दा या भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता शरद पवार अाणि प्रफुल पटेल एका खासगी जेट विमानाने अहमदाबादला गेल्यावर अदानी शांतिग्राममधील एका विश्रामगृहामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि मग सकाळी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचा दावा दिव्य भास्कर यांच्या बातमीत केलेला आहे.

Advertisement

शहा रविवारी अहमदाबादला पोहोचणार होते. परंतु ते शुक्रवारी सायंकाळी उशिरा अहमदाबादेत दाखल झाल्यावर शनिवारचा त्यांचा पूर्ण दिवस राखीव होता असेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळेच शहा हे शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांव्यतिरिक्त ते गुजरात भाजपमधील एकाही नेत्याला भेटले नाहीत, असेही म्हटले जात आहे.

Advertisement

यावर ‘सर्वच गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी नसतात’ असे सूचक वक्तव्य शहा यांनी केले आहे. तर, शहा यांना जे सुचावयचे होते ते सुचवले अशी पहिली प्रतिक्रिया भाजपकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. गुजरातीमध्ये ‘केम छो’ (काय चाललयं) असे नेमके कोणी कोणाला म्हटलेय आणि म्हातालेच की नाही याबद्दल मात्र ठोस माहिती एकानेही दिलेली नाही.

Advertisement

त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीचे खापरही भाजपवर फोडताना म्हटले आहे की, ही भाजपने पसरवलेली अफवा आहे. पवार आणि पटेल हे राष्ट्रवादीचे नेते अहमदाबाद येथून एकत्र आले होते. पण, ते कुणालाही भेटले नाहीत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply