Take a fresh look at your lifestyle.

वाझेवर पडली मगर’मिठी’; पहा नेमके काय पुरावे सापडलेत पाण्यातून

मुंबई :

Advertisement

मुंबई पोलिसांतील निलंबित अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याचवेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीबद्दलही काही पुरावे समोर येत आहेत. मिठी नदीतून याप्रकरणाशी निगडीत काही पुरावे सापडले आहेत.

Advertisement

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी वाझे याला मिठी नदीवर आणले. त्यानंतर पाणबुड्यांच्या मदतीने नदीतून दोन नंबर प्लेट, सीपीयू, हार्ड डिस्क आणि डीव्हीडीसारखे पुरावे बाहेर काढण्यात आले. हिरेन याच्या हत्येशी संबंधित हे सर्व पुरावे असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या समुद्राच्या खाडीमध्ये सापडला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये वेगळा संशय असल्याचे हिरेन यांच्या कुटुंबीयांनी म्हटल्यावर या प्रकरणाच्या तपासाला गती आली. त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे दररोज येत आहेत. त्यामुळे नेमके पुढे काय समोर येणार, याचीच उस्तुकता शिगेला पोहोचली आहे.

Advertisement

अँटिलियासमोर स्फोटके भरून गाडी उभी करण्यासह हिरेन यांच्या हत्येत पोलिस अधिकारी सचिन वाझे हाच मुख्य आरोपी असल्याचे पुरावे पुढे येत असल्याचे दिसत आहे. या हत्याकांडात वाझेशिवाय आणखी काही लोक सहभागी आहेत यावर आता तापसी अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Advertisement

सट्टेबाज नरेश आणि मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांची समोरासमोर वाझेसमोर बसवून चौकशी एनआयएने केली आहे. याप्रकरणी १.२ जीबी डाटा, वेगवेगळे मोबाइल फोन, जळालेले कपडे आणि काही कागदपत्रे तापसी अधिकारी आणि टीमने जप्त केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply