Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ 4 शेअर देऊ शकतात कलरफुल ग्रोथ; पहा कोणत्या आहेत ‘त्या’ कंपन्या

पुणे :

Advertisement

होळी जशी लोकांच्या जीवनात आनंदाचा रंग भरते, त्याच पद्धतीने पैशांची ग्रोथही जीवनाला कलरफुल बनवते. त्यामुळेच होळीच्या निमित्ताने आपण पाहूयात की आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे काही शेअर्स असावेत जे आपली संपत्ती वाढविण्यात आणि लाईफ कलरफुल करण्यास मदत करतील. याबाबतची माहिती फायनान्शियल एक्स्प्रेसने प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

यातील पहिला आणि इन्व्हेस्टर्स मंडळींचा आवडता शेअर म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. हा शेअर सध्याच्या किंमतीवर तुमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरू शकतो. ब्रोकरेज हाऊस जेफरीजने रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकीची शिफारस करत 2600 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. या शेअरची किंमत सध्या 1994 आहे. सध्याच्या किंमतीनुसार पुढील काही महिन्यांत यातून 30 टक्के परतावा मिळू शकेल.

Advertisement

आगामी काळात जिओमध्ये जोरदार वाढ होईल असा ब्रोकरेज हाऊसला विश्वास वाटत आहे. आर्थिक वर्ष 2021 ते 2023 दरम्यान आरआयएलची टेलिकॉम सेक्टरच्या जियोमध्ये 25 टक्क्यांची वाढ शक्य आहे. याच काळात रिलायन्सच्या किरकोळ व्यवसायात 43 % वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताळेबंद मजबूत असताना ऑईल-टू-केमिकल हा मुद्दाही मोठा ट्रिगर होऊ शकते.

Advertisement

कॅडिला हेल्थकेअरबाबत एमके ग्लोबल फायनान्शियलने 650 रुपयांचा लक्षांक दिला आहे. सध्या या शेअरची किंमत 420 रुपयांच्या पातळीवर आहे. या किंमतीनुसार स्टॉकद्वारे 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकेल. कॅडिलाने नुकतेच इनोवेटर Celgene (BMS सह सेट पेटंटची माहिती जाहीर केला आहे. कंपनीसाठी ही सकारात्मक बातमी आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 3823 कोटी रुपये कमावले आहेत. जे वार्षिक आधारावर 4.5 टक्क्यांनी जास्त आहेत.

Advertisement

आयसीआयसीआय बँक या शेअरबाबत ब्रोकरेज हाऊस डोलाट कॅपिटलने 770 रुपयांचा लक्षांक जाहीर केला आहे. सध्याच्या 578 रुपयांच्या किंमतीनुसार याद्वारे 33 टक्के परतावा मिळू शकेल. बँकेच्या कर्जाची वाढ चांगली होत आहे. ताळेबंद ग्राहक बेससह मजबूत आहे. भांडवलाची मजबूत स्थिती ही बँकेची शक्ती असते. त्याच वेळी, स्टॉक त्याच्या उच्चांकडून दुरुस्तीनंतर चांगल्या मूल्यांकनावर आहे.

Advertisement

डिव्हाइस लॅब या शेअरबाबत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी 4530 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्या हा शेअर 3465 रुपये किमतीला आहे. त्यानुसार याद्वारे 31 टक्के परतावा मिळू शकतो. डिव्हाइस लॅब ही एक अग्रगण्य फार्मा कंपनी आहे. कंपनी जेनेरिक एपीआय स्पेसमध्ये उत्पादनांची ऑफरिंग वाढवित आहे.

Advertisement

(हा सल्ला आणि यातील माहिती व अंदाज हे ब्रोकरेज हाऊसच्या अहवालाच्या आधारे आहेत. गुंतवणूकीचा सल्ला म्हणजे पैसे कमावण्याची संधी असते असेच काहीही नाही. बाजारातली जोखीम लक्षात आपण गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करूनच याबाबतचे निर्णय घ्यावेत.)

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply