Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ताज हॉटेल 3 दिवसांसाठी केले सील; वाचा नेमके काय आहे कारण

दिल्ली :

Advertisement

उत्तराखंड राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.राज्यभरात रुग्णसंख्या वाढत असतानाच हृषीकेश येथील हॉटेल ताज हॉटेलमध्ये तब्बल 76 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे हॉटेल तीन दिवसांसाठी बंद ठेवले आहे.

Advertisement

टिहरी-गढवाल येथील एसएसपी तृप्ती भट यांनी याबाबत माहिती दिली आहे. खबरदारी म्हणून हॉटेल स्वच्छ केले करून बंद केले आहे. हृषीकेशमधील बद्रीनाथ महामार्गावरील सिंगतालीजवळील ताज हॉटेलमध्ये शनिवारी 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर या हॉटेलमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Hotel Taj in Rishikesh closed for three days by the district administration, after 76 people were found to be #COVID19 positive there. The hotel was sanitised and has been closed as a precautionary measure: Tehri Garhwal SSP, Tripti Bhatt #Uttarakhand” / Twitter

Advertisement

फकोट ब्लॉकचे आरोग्य प्रभारी डॉ. जगदीशचंद जोशी यांनी सांगितले की, 25 मार्च रोजी हॉटेल कामगारांचे आरटीपीसीआर नमुना घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला. ज्यामध्ये 25 हॉटेल कामगार कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. ज्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण निरंतर वाढत आहे.

Advertisement

विशेष म्हणजे रविवारी सर्वाधिक 366 संसर्गजन्य रुग्ण आढळले होते. त्याचबरोबर राज्यात सक्रीय प्रकरणांची संख्या 1600 च्याही पार झाली आहे. आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 99,881 वर पोहोचली असून त्यापैकी 95,025 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रविवारीही 42 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply