Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरणी ATS ने मांडलेत ‘हे’ 8 मुद्दे; पहा नेमके काय म्हटलेय त्यात

मुंबई :

Advertisement

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या प्रकरणाचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांच्याकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे गेला आहे. ATS ने याप्रकरणी केलेल्या तपासातून काही मुद्दे पुढे आलेले आहेत.

Advertisement

तपासातून पुढे आलेले मुद्दे असे :

Advertisement
  1. वाझेनेच मनसुखला ‘तावडे’ नावाने व्हॉट्सअॅपवर कॉल केले होते. त्या दोघांचे संभाषण मनसुख यांची पत्नी विमला यांनी ऐकले होते. मनसुखची हत्या करण्यात आली त्यावेळी वाझे आपल्या Audi कारमध्ये बसून सर्व पाहत होता.
  2. मनसुखची हत्या रात्री 10 वाजता करण्यात आली. त्यानंतर रात्री जवळपास 11 वाजता सचिन मुंबईत आला आणि त्याने जवळपास पावणे 12 वाजता डोंगरीच्या टिप्सी बारमध्ये रेड मारण्याचे ढोंग केले. उद्योजक सचिन वाझेनेच अंबानींना धमकीचे पत्र लिहिले होते. हा खुलासा विनायक शिंदेच्या घरात काम करणाऱ्या एका पेंटरने केला होता.
  3. सीडीआर रिपोर्टनुसार, वाझेने हत्या करण्याच्या दिवशी एकही फोन कॉल केला नाही. त्याने कुणाचाही फोन सुद्धा रिसीव्ह केला नाही. तरीही तो केवळ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉल करत होता. सचिन वाझेने आपला जबाब देताना सांगितले होते की तो 4 मार्च रोजी मुंबई पोलिस मुख्यालयातील CIU कार्यालयात होता. पण, मोबाईलचे लोकेशन दुपारी पावणे एक वाजता चेंबूर येथे दाखवत होते.
  4. सचिन वाझेने डोंगरीतील टिप्सी बारमध्ये रेड मारण्याचे ढोंग केले. जेणेकरून मनसुखच्या हत्येचा तपास झाला तर त्याला आपण डोंगरीतील तपासात व्यस्त होतो असे सांगता येईल. टिप्सी बारच्या CCTV मध्ये वाझेने धाड टाकल्याचे पुरावे सापडले.
  5. ठाणेतील घोडबंदर परिसरात आल्यानंकर सचिन वाझे आधी पोलिस मुख्यालयात पोहोचला. त्यानंतर CIU च्या आपल्या कार्यालयात गेला. मग या ठिकाणी आपले मोबाईल चार्जिंगवर लावले. जेणेकरून पोलिस मुख्यालयात असल्याचे लोकेशन मिळेल.
  6. मनसुखकडे एक मोबाईल असले तरी त्यामध्ये तो दोन सिमकार्ड वापरत होता. ATS ने त्या दोन्ही नंबरचे सीडीआर काढले. त्यातील एका नंबरवर मनसुखला त्याची पत्नी विमला यांनी रात्री 8 वाजून 32 मिनिटाला कॉल केला होता असे कळाले. तर दुसऱ्या नंबरवर शेवटी 10 वाजून 10 मिनिटाला 4 मेसेज आले होते. त्यावेळी फोन वसई येथील मालजीपाडा परिसरात होता.
  7. याच प्रकरणात अटकेत असलेल्या विनायक शिंदेने सांगितल्याप्रमाणे, तो वाझेंना कॉल करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या एका सिमकार्डचा वापर करत होता. हे सिमकार्ड त्याने क्रिकेट बुकी नरेश गोरच्या माध्यमातून गुजरातेतून मागवले होते.
  8. वाझेने आपल्या षडयंत्रात मनसुखला सामिल करून घेतले होते. याचे पुरावे ATS आणि NIA ला सुद्धा सापडले. पण, जेव्हा ATS ने सचिन वाझेची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यातही मनसुख भीतीने सामिल झाला होता की आपल्या मर्जीने हे सुद्धा सिद्ध होऊ शकले नाही. सध्या दोघांमध्ये झालेल्या संवादाचे डिजिटल पुरावे एटीएसकडे आहेत.

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply