Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. महाबँकेला लाखोंचा गंडा; सर्कल-तलाठ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर :

Advertisement

बनावट कागदपत्रांच्या आधारावर लाखो – कोटींचा गंडा घालणारे ठग आपल्याला नेहमीच आढळून येतात. अशी फसवणूक कोणा सामान्य माणसाची नव्हे तर चक्क बँकेची झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना अहमदनगर येथील महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेत घडली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापनाने या ठगांवर गुन्हा नोंदविला आहे. 

Advertisement

बनावट लेटरहेड आणि शिका तयार करून बँकेची ५ कोटी १ लाख ८४ हजार ६१४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सावेडी शाखा व्यवस्थापक सागर अंबिकाप्रसाद दुबे ( रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरून नागापूरचे मंडलाधिकारी, तलाठी यांच्यासह सात जणांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत सविस्तर माहिती अशी की मवाळ इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रो आर. अँड डी. सेंटर अँड सोल्युशनचे महाराष्ट्र बँक सावेडी शाखेत कॅश क्रेडीट कर्जखाते आहे. कर्ज बोजा शिल्लक असतानाही बँकेची फसवणूक करण्याच्या हेतूने मवाळ इन्फ्रास्ट्रक्चरच्या भागीदार अशोक मवाळ, भरत मवाळ, पंकज मवाळ, मृदुल मवाळ यांनी बनावट लेटरहेड आणि शिक्का तयार करून तलाठी व मंडलाधिकारी यांना हाताशी धरून बोजाची नोंद बेकायदेशीररित्या उतरवली. 

Advertisement

हे लक्षात येताच शाखाधिकारी दुबे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल आहे. त्यावरून नागापूर मंडलाधिकारी जगन्नाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र देशपांडे, नागापुरचे तलाठी संदीप तरटे यांच्यासह मवाळ इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार अशोक मवाळ, भरत मवाळ, पंकज मवाळ, मृदुल मवाळ यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply