Take a fresh look at your lifestyle.

करोना लस देण्यास केंद्राकडून टाळाटाळ; पहा कुणी केलाय हा गंभीर आरोप

मुंबई :

Advertisement

परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांना लस पाठवत आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला आहे.

Advertisement

राज्यात करोना व्हायरस वेगाने फैलावत चालला आहे. त्यामुळे राज्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवणे आवश्यक आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरण मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता. त्या काळात तर थेट बसस्टँडवर देखील लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवल्यामुळे महामारीवर मात करण्यात यश मिळाले होते. आता मात्र सध्याचे सरकार असे करताना दिसत नाही.    

Advertisement

अधिकाऱ्यांनी नेहमी जनतेला न्याय देण्याचे काम करावे. कोणाचीही कठपुतळी बनू नये. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करु लागले तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply