Take a fresh look at your lifestyle.

कडाक्याचा उन्हाळा; या भागाला बसतेय सर्वाधिक झळ, पहा कितीवर गेलेय तापमान

मुंबई :

Advertisement

देशभरात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत जात आहे. दुपारच्या वेळेस तापमानात कमालीची वाढ होत आहे. गुजरात, मुंबई आणि कोकणात शनिवारी उष्णतेची लाट कायम होती. तसेच राज्यातील उर्वरीत शहरांतील तापमान सुद्धा वाढत असून दिवसाचे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. पुढील पाच दिवस तापमान वााढतेच राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि कोकण भागात उष्णतेची लाट जाणवत आहे. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हाने तापमानात मोठी वाढ झाली आहे. येथील तापमान ४० अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथील हवामान आगामी पाच दिवस तापमान वाढतेच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Advertisement

राज्याची राजधानी मुंबईतही तापमान वाढत आहे. या शहरात करोना व्हायरसही वेगाने पसरत आहे. त्यातच आता वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी शहरात ३९ अंश सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद घेण्यात आली. मुंबई जवळील ठाणे शहरातही कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. राज्याच्या अन्य भागातही तापमान वाढत आहे.

Advertisement

राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले होते. त्यानंतर आता कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. एप्रिल आणि मे महिन्यातही तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply