Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी आरक्षणप्रकरणी फुके यांनी केला गंभीर आरोप; पहा काय म्हटलेय त्यांनी काँग्रेसबाबत

नागपूर :

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. खानविलकर यांच्या खंडपीठाने दि. ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निकालानुसार राज्यातील २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. त्यावेळी याबाबतची याचिका कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघातील कॉंग्रेस पक्षाचेच जिल्हा परिषद सदस्य व भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केली होती. हा मुद्दा सांगून काँग्रेसने ओबीसी आरक्षण कट रचून कमी केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

Advertisement

डॉ. फुके यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ओबीसी मंत्रालय काँग्रेसकडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. उलट हे आरक्षण संपवण्याचा डाव त्यांनीच आखला आहे. हा काँग्रेस पक्षाचा ढोंगीपणा आहे.

Advertisement

ओबीसीच्या नावाखाली मतदान घ्यायचे, मोर्चे आणि आंदोलने करताना लोकांना ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही, अअसेही सांगायचे काम काँग्रेस करीत आहे. दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू न देण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप डॉ. फुके यांनी केला आहे.

Advertisement

त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यावेळी गप्प होते. काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर, हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे, असा प्रश्नही डॉ. फुके यांनी केला आहे.

Advertisement

न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महविकास आघाडी सरकार ओबीसीसाठी आयोग स्थापन करत नाही. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे असे या सरकारलाच वाटत नाही ही वस्तुस्थिती असून यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. ओबीसी समाज काँग्रेसला आणि या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply